Monday, June 24, 2024
Google search engine
Homeअकोलालोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा विचारमंथन,दिनदर्शिका प्रकाशन व सन्मान समारंभ संपन्न
spot_img
spot_img

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा विचारमंथन,दिनदर्शिका प्रकाशन व सन्मान समारंभ संपन्न

 

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा विचारमंथन,दिनदर्शिका प्रकाशन व सन्मान समारंभ संपन्न

अकोला- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ गतिमान वाटचालीने पत्रकारांच्या प्रश्नांवर सक्रिय राहून मोतीबिंदू शस्त्रक्रिया,आरोग्य शिबीरे,शालेय व विविध सामाजिक आणि स्वास्थ,मनस्वास्थाचे निरंतर उपक्रम राबवित असून मार्गदर्शन उपक्रम जागृती आणि प्रबोधनातून सेवाकार्यात अग्रेसर म्हणून महाराष्ट्रात सिध्द झालेला आहे.पत्रकार आणि सामाजिक उपक्रमातील सक्रियतेने विविध क्षेत्रातील अग्रेसर व्यक्तींना सन्मानित करीत सर्वसमावेशकता जोपासणारा हा पत्रकार महासंघ आहे.असे मनोगत प्रा.डॉ.संतोषभाऊ हूशे आणि सन्मानित अतिथींनी व्यक्त केले.

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा दुसऱ्या टप्प्यातील व्दितीय विचारमंथन मेळावा व उल्लेखनीय कार्य व बहूमानप्राप्त अतिथींचे सत्कार तथा २०२४ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.याप्रसंगी सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व समाजोध्दारक गाडगेबाबांना वंदन आणि शहीद जवान,विविध घटनांमधील बळी गेलेल्या व्यक्तींना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

स्थानिक जठारपेठेतील जैन रेस्ट्रो येथे लोकस्वातंत्र्यचे संस्थापक – राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.प्रा.डॉ संतोष भाऊ हूशे हे प्रमुख अतिथी तर सोपानदेव ग्रामगीता पुरस्कारप्राप्त कवी संतोष उर्फ विश्वासराव देशमुख (निंबेकर),सामाजिक,शैक्षणिक सेवाव्रती अशोकराव सिरसाट,नाट्यकलावंत व सेवाव्रती मनोज देशमुख या सत्कारमूर्ती विशेष उपस्थित अतिथींना सन्मानपत्र,शाल,पुस्तक व पुष्पगुच्छे देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी केन्द्रीय सचिव राजेन्द्र देशमुख,अंबादास तल्हार यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी दिनदर्शिकेसोबतच प्रा.सुरेश कुलकर्णी यांच्या पसायदानामृत मासिकाच्या विशेषांकाचे व सागर लोडम यांच्या वऱ्हाडवृत्त दिपोत्सवचे विमोचन करण्यात आले.राजेन्द्र देशमुख यांनी प्रास्ताविकातून महाराष्ट्रभर पसरत चाललेल्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाला मिळत असलेल्या प्रतिसादाची माहिती देऊन दिनदर्शिकेला रू.२ लाख ५० हजारांच्या जाहिराती देणाऱ्या जाहिरातदारांप्रती आभार व्यक्त केले.उपस्थित अतिथींनी सर्वसमावेशकता आणि सामाजिक भावनांबध्दल कवितांच्या दाखल्यांसह तर विश्वासराव देशमुख यांनी खास कवितेतून ह्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

जिल्हा संघटन संपर्क प्रमुख सौ.दिपाली बाहेकर यांच्या बहारदार संचलनाखाली झालेल्या या कार्यक्रमात अध्यक्षिय मनोगतातून संजय देशमुख यांनी सहकारी पदाधिकारी,सभासद यांच्या उपक्रमांमधील उल्लेखनिय सहभागाचा गौरव करून त्यांच्यासह सर्व पत्रकार तथा स्नेही बांधवांना नववर्षाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.या कार्यक्रमाला केन्द्रीय उपाध्यक्ष किशोर मानकर,अॕड.नितीनजी अग्रवाल,साहित्य व संस्कृती मंडळ सदस्य पुष्पराज गावंडे,विजयराव देशमुख,अॕड.राजेश जाधव, डॉ.शंकरराव सांगळे, डॉ.विनय दांदळे,जिल्हाध्यक्ष सागर लोडम,विजयराव बाहकर,शामभाऊ देशमुख,मनिषजी खर्चे,प्रा.सुरेश कुलकर्णी,राजाभाऊ देशमुख,देवीदास घोरळ,धारेरावजी देशमुख,प्रा.विजय काटे, अशोककुमार पंड्या,रविन्द्र देशमुख,सुरेश भारती,सतिश लोखंडे,सौ.निताजी पंड्या,अॕड.संकेत देशमुख,कैलास टकोरे,सतिश देशमुख,दिलीप नवले,कृष्णाभाऊ चव्हाण,अनंत महल्ले,शिवचरण डोंगरे,गजानन चव्हाण,सतिश देशमुख (उगवेकर),पंकज देशमुख,व अनेक सभासद पत्रकार उपस्थित होते.अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.आभारप्रदर्शन कादंबरीकार ,पुष्पराज गावंडे यांनी केले.

 

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page