Tuesday, May 21, 2024
Google search engine
Homeअकोलास्व.रामदास भैय्या दुबे न प शाळेत बाल क्रीडा महोत्सव
spot_img
spot_img

स्व.रामदास भैय्या दुबे न प शाळेत बाल क्रीडा महोत्सव

 

मूर्तिजापूर – शहरातील आयएसओ मानांकन प्राप्त डिजिटल स्कूल स्व रामदास भैया दुबे नगरपरिषद प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा या शाळेमध्ये दिनांक १२जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती व राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त बाल क्रिडा महोत्सावाचे आयोजन करण्यात आले होते.शाळेमध्ये बालसंसद हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांनी स्वतः मतपेटी मध्ये मतदान करून शाळेचे मंत्रिमंडळ निवडून दिले.

 

दुपारच्या सत्रानंतर मुलांचा खो खो स्पर्धा घेण्यात आली वर्ग तिसरा व चौथा या दोन गटामध्ये चौथा वर्ग विजयी झाला.

वर्ग दुसरा व पहिला या गटामध्ये वर्ग दुसरा विजय झाला. अंतिम फायनल सामना वर्ग दुसरा व चौथामध्ये झाला. त्यानंतर फायनल विजयी संघ इयत्ता दुसरी हा ठरला.या बरोबरच शाळेमध्ये धावणे स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धा, पोत्यातील उड्या, लंगडी स्पर्धा, बकेट बॉल स्पर्धा, झिक्झॅक धावणे स्पर्धा, बलून स्पर्धा कबड्डी लगोरी इत्यादी अनेक प्रकारचे खेळ शाळेमध्ये घेण्यात आले. या खेळामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप झोडपे ,शिक्षक विशाल अंबळकार, शुभांगी येऊल ,दीपक हांडे ,श्रीमती अनिता देवके, कु. संजीवनी भगत,सुषमा बाळापुरे इत्यादी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून क्रीडा महोत्सव यशस्वीपणे पूर्ण केला.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page