Tuesday, May 21, 2024
Google search engine
Homeअकोलारेपाडखेड येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनासोबत घेतला वनभोजनाचा आस्वाद
spot_img
spot_img

रेपाडखेड येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनासोबत घेतला वनभोजनाचा आस्वाद

विदर्भ संपादक मिलींद जामनिक 

मूर्तिजापूर – शिक्षणासोबत मानवी जीवनात पर्यावरणाचे असलेले महत्त्व अवगत व्हावे यासाठी विद्यार्थ्यांना शहरालगतच्या श्री संत पुंडलिक महाराज संस्थान,पुंडलिक नगर येथे निसर्गरम्य वातावरणात वनभोजनाचा आनंद घेता यावा यासाठी क्षेत्रभेटीचे आयोजन (ता.५ )केले होते.

तालुक्यातील रेपाडखेड येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनासोबत घेतला वनभोजनाचा आस्वाद शाळेचे कृतिशील मुख्याध्यापक जीएन इंगळे हे दरवर्षी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने व्यर्थ खर्च न करता समाजाचा एक घटक म्हणून समाजाचं आपण काही देणं लागतो या हेतूने नेहमी विविध सामाजिक उपक्रमाची सांगड घालत असतात ती अशी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप,पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड किंवा विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करून त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी किंवा त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध बक्षीस योजना अशा कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना शिक्षणाबद्दलची आवड निर्माण करून त्यांच्यात ऊर्जा निर्माण करत असतात परंतु यावर्षी शिक्षणासोबतच मानवी जीवनात पर्यावरणाचं असलेले महत्त्व हे विद्यार्थ्यांना अवगत व्हावे यासाठी शहरालगतच्या श्री संत पुंडलिक महाराज संस्थान येथे निसर्गाच्या सानिध्यात असलेलं निसर्गमय वातावरण हे विद्यार्थ्यांना अनुभवता यावं यासाठी क्षेत्र भेटीचे आयोजन केले होते आणि त्यासोबत भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे वनभोजनाचा आनंद घेताना विद्यार्थी मग्न होते.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जि.एन.इंगळे, स.शिक्षीका कुं.एस.इंगळे, शिक्षक एन.के.घुबडे, प्रथमचे विभागीय प्रमुख सुनिल इंगळे, शालेय पोषण आहाराच्या वनमाला जामनिक, वेदांत इंगळे, बंडूभाऊ जामनिक, सारीका इंगळे, दिपक जामनिक यांच्या सह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page