शेतकऱ्यांची तहसील कार्यालयात धडक
सडलेली कांदे तहसीलदारांच्या टेबलवर टाकून शेतकऱ्याचा आक्रोश
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यात मागील काही दिवसांत अवकाळी पावसाने थैमान घातल्याने कांदा पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनि शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात धडक देऊन दोन दिवसांत सर्वेक्षण करण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना सादर करण्यात आले.
मागील एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने प्रचंड थैमान घालून शेतकऱ्यांच्या कांदा पिकासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कांदा जमिनीत पूर्णपणे सडल्याने उत्पादन होणार नाही रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कांदाचा दुर्गंध येत असल्याने कांदा लागवडीच्या तुलनेत लागवडीचा खर्च सुद्धा निघणार नसल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे तेव्हा तात्काळ सर्वेक्षण करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनि तहसीलदारांना घेराव करून सडलेली कांदे तहसीलदार यांच्या टेबलवर टाकून तीव्र आक्रोश व्यक्त केला यावेळी दोन दिवसांत सर्वेक्षण करण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिले सर्वेक्षण करून शासनास अहवाल पाठविण्यात येईल असे तहसीलदार यांनी सांगितले यावेळी शिवसेनेचे प्रकाश मारोटकर शहर प्रमुख निलेश इखार रवी ठाकूर गोपाल बनकर अशोक पोफळे प्रकाश इखार चेतन डकरे लोकेश उटबगले महेंद्र भेंडरकर बाळ्या गावफळे इस्माईल खा राजेंद्र डकरे चंदू देशमुख जयप्रकाश सुने गणेश चांदणे लीलाधर चौधरी प्रल्हाद मूळे दिलीप ब्राम्हणवाडे मनोज राठोड गजानन पोफळे दिपक मूळे सुधीर देवघरे रमेश उटबगले अरुण गिरी गणेश भेंडरकर इत्यादी शेकडो शेतकरी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या धाम धुमीत अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या सर्वेक्षणाची प्रशासनाने दिरंगाई झाली दोन दिवसांत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानिचे सर्वेक्षण न केल्यास शिवसेना स्टाईलने तहसीलदार यांच्या कक्षात आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी दिला.