Tuesday, May 21, 2024
Google search engine
Homeअमरावतीसुगवे आश्रम चांदुर रेल्वे येथे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर नैसर्गिक पद्धतीने बनवण्यात आलेल्या...
spot_img
spot_img

सुगवे आश्रम चांदुर रेल्वे येथे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर नैसर्गिक पद्धतीने बनवण्यात आलेल्या धुपबत्तीचा मोठ्या थाटात लोकार्पण सोहळा

 

सुगवे आश्रम चांदुर रेल्वे येथे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर नैसर्गिक पद्धतीने बनवण्यात आलेल्या धुपबत्तीचा मोठ्या थाटात लोकार्पण सोहळा संपन्न..

 

 

अमरावती,चांदुर रेल्वे :  चांदुर रेल्वे तालुक्यात सुगवे आश्रमची चांगलेच ओळख निर्माण झालेली आहे. सुगवे ही अध्यात्मिक संस्था, आपल्या चांदूर शहरात वीस वर्षापासून आपले कार्य अविरत करत आहे आणि या सोबतच वेळोवेळी चांदुरवासियासाठी काही सामाजिक उपक्रम राबवित असते.

आजवर तरुण मुला-मुलींसाठी अनेक कार्यक्रम घेतले आहे.  गोरगरिबांना ब्लॅंकेट , कपडे वाटप, दिवाळीनिमित्त फराळ वाटप अनाथ मुला मुलींना शालेय साहित्य वाटप असे अनेक प्रकारचे कार्यक्रम घेतले आहेत.

स्पोर्ट्स चे कार्यक्रम , एम्प्लॉयमेंट विषयी तज्ञ लोकांच्या माध्यमातून वेळोवेळी मार्गदर्शन त्याविषयी कार्यक्रम घेतले आहे .तर अशाप्रकारे हे आपले अध्यात्मिक आणि सामाजिक सेवा भावी कार्य संस्थेद्वारे निरंतर सुरू आहेत.

सुगवे संस्थेमध्ये अत्याधुनिक गौरक्षण असल्याने तिथे भरपूर मोठा प्रमाणात स्वच्छ गोमय शेणाचा साठा असल्याने त्यापासून शुद्ध प्रतीचे नैसर्गिक रितीने धूपबत्ती उत्तम प्रतीचे सुगंधीत धुपबत्तीचे प्रसाधने व शेणा पासून बनवण्यात येणाऱ्या चार प्रकारच्या वेगवेगळ्या प्रतीचे (उत्पादने) तयार करण्यास सुरूवात केली आहे . सुगवे संस्थेचा या उपक्रमामुळे चांदुर रेल्वे परिसरातील बेरोजगार युवक ,युवतींना रोजगार उपलब्ध झाला आहे .

आज अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्तावर स्वामी अनिलजी महाराजांच्या मार्गदर्शनाने आज चांदूर रेल्वेत स्थित सुगवे आश्रमा मध्ये ,अनु वैज्ञानिक सुनिल घाडगे  यांच्या हस्ते सुगवे सुगंधी धूपबत्ती भव्य लोकार्पण सोहळा करण्यात आला.

सुनिल घाडगे यांनी उपस्थित लोकांना सुगवे सुगंधी धूपबत्तीची सविस्तर माहिती दिली.

या सोहळ्या करिता सुगवे संस्थेचे उपाध्यक्ष धीरजभाऊ डेहनकर, अनिल कांबळे , शुभम काकडे , पत्रकार राजी thव शिवणकर, रणविजय बोरगावकर,संतोष मोदी आदी मान्यवर उपस्थित होते..

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page