Wednesday, October 9, 2024
Google search engine
Homeअमरावती#GavakadachiBatmi | विरूळ रोंघे गावठाण च्या जागेवर माजी सरपंच अतुल वाघ यांचे...
spot_img
spot_img

#GavakadachiBatmi | विरूळ रोंघे गावठाण च्या जागेवर माजी सरपंच अतुल वाघ यांचे अतिक्रमण ?

विरूळ रोंघे येथील गावठाण च्या जागेवर माजी सरपंच अतुल वाघ यांचे अतिक्रमण ?

तात्काळ अतिक्रमण न काढल्यास ग्रा. प. सदस्याने दिला उपोषणाचा इशारा

 

धामणगाव रेल्वे – गावठाण मधील जागेवर शेतकरी तथा विरूळ रोंघे ग्रा. प. चे माजी सरपंच अतुल वाघ यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असल्याची तक्रार संबंधित प्रशासनाकडे देण्यात आली असून तात्काळ अतिक्रमण न काढल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे ग्रा. प. सदस्य मंगेश गुल्हाने यांनी स्पष्ट केले आहे.

सविस्तर असे कि, विरूळ रोंघे येथून गुंजी – तरोडा कडे जाणाऱ्या रस्त्यावर गावालगतच माजी सरपंच अतुल वाघ यांचे शेत गट न. १ व २ हे शेत आहे. रोडलगतच असलेल्या शेताचा फायदा घेत त्यांनी गावठाण मधील रोड सुद्धा आपल्या ताब्यात घेऊन त्यावर लोखंडी रॉड रोवून तारांचे पक्के कुंपण घालून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे गुंजी तरोडा कडे जाणारा रस्ता हा अरुंद झाला आहे तत्पूर्वी २०२२ मध्ये याच रोडलगत काही ग्रामस्थांनी शेणखताचे ढिगारे ठेवले असता माजी सरपंच यांनी ग्रामस्थांनी ठेवलेले शेणखताचे ढिगारे उचलून तिथे बऱ्याच प्रमाणात मुरूम टाकून ती जगात ताब्यात घेतली होती. त्यामुळे सदर माजी सरपंचाची तक्रार महसूल विभागाकडे करण्यात आली होती मात्र त्यावर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

परंतु आता काही दिवस अगोदर माजी सरपंच अतुल वाघ यांनी सदरच्या जागेवर लोखंडी रॉड रोवून तारांचे पक्के कुंपण घातले. त्यामुळे सदरच्या विषयाची तक्रार खुद्द ग्रा. प. सदस्य मंगेश गुल्हाने यांनी संबंधित प्रशासनाकडे केली आहे. तर तक्रारीत यापूर्वी सुद्धा सदरच्या विषयाची तक्रार देऊनही कोणती कार्यवाही न झाल्याने यावर तात्काळ कारवाही न झाल्यास उपोषणाला बसणार असल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे प्रशासन आता या विषयावर कोणती भूमिका घेणार हे पाहणे तेवढेच महत्वाचे ठरणार आहे.

माजी सरपंच अतुल वाघ यांनी मोठ्या प्रमाणात गावठाण जाग्यावर अतिक्रमण केले आहे. सदरचा विषय महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाशी येत असून तात्काळ शेतमालकाची जागा मोजून त्यांनी केलेले अतिक्रमण निष्कासित करण्याची कार्यवाही करावी. अन्यथा मी उपोषणाला बसणार. –

मंगेश गुल्हाने, ग्रा. प. सदस्य, विरूळ रोंघे

सदरचा विषय महसूल विभागाशी निगडित आहे, ग्रा. प. मध्ये सदस्यांची तक्रार प्राप्त आहे त्या अनुषंगाने माजी सरपंच याना नोटीस देण्यात आली आहे. –

रुपेश गुल्हाने, सरपंच, ग्रा. प. विरूळ रोंघे

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page