Tuesday, May 21, 2024
Google search engine
Homeगावाकडची बातमीकुंटुंब प्रमुखाच्या भूमीकेत उभा राहिला सचीन धुमाळ नावाचा मसिहा...!
spot_img
spot_img

कुंटुंब प्रमुखाच्या भूमीकेत उभा राहिला सचीन धुमाळ नावाचा मसिहा…!

वाढदिवसाचा व्यर्थ खर्च टाळला अन् सुख समाधानाने जेऊ घातले वृद्धाश्रमातले निराधार मायबाप

ज्यांचा कोणी वाली नाही त्यांच्यासाठी तत्पर असल्याचे सचिन धुमाळ यांनी दाखवून दिले 

पंढरपूर – वाढदिवस म्हटलं की आनंदाचा दिवस हा दिवस आपण प्रत्येक जण आपापल्या परीने साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो कोणी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न करतात तर कोणी समाजाला असलेली गरज त्या गरजेवर खर्च करून त्यातून मिळणाऱ्या समाधानात आपला आनंद साजरा करत असतो अशातच सचिन धुमाळ व त्यांच्या परिवाराने वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमातील निराधार मायबापांना मिस्टानाचे भोजनदान देऊन आपला वाढदिवस साजरा केला.

आर.बी.डिजिटल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक सचिन धुमाळ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथे वृध्दांना अन्नदान करण्यात आले. यावेळी त्यांचे वडील रमेश धुमाळ, आजी रुक्मिणी धुमाळ, आई आशाबाई धुमाळ, चुलते बाळासाहेब धुमाळ, मोहन धुमाळ, बंधू उत्तम धुमाळ, कल्याण कुसुमडे, सर्जेराव कदम, सिताराम गांडुळे, अमोल भोसले बाळासाहेब घोडके, संतोष धुमाळ विनायक धुमाळ, मोनाली धुमाळ आदी उपस्थित होते. व्यवस्थापक धनाजी राक्षे यांनी आभार मानले. सचिन धुमाळ यांच्यावतीने प्रत्येक ७ तारखेला शंभर ते दीडशे गोरगरीब गरजू लोकांना जेवण वाटप केले जाते. सचिन धुमाळ हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. पंढरपूर तालुक्यातील बोहाळी गावातील सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर दिल्ली येथे स्वतः च्या कंपनीचे ऑफिस असून संपूर्ण देशात त्यांचे कार्य पसरले आहे.वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या एनजीओ यांचे कार्यात सचिन धुमाळ यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांना मोठमोठे शिबीरे घेऊन मार्गदर्शन करतात. केंद्र सरकार, राज्य कार यांच्यामार्फत सामाजिक टनांना ते आर्थिक सहकार्य ननाच्यावतीने करून देतात. त्यामुळे त्यांचे कार्याचा विस्तार पूर्ण देशात आहे.

 

गोरगरीब लोकांना, शैक्षणिक संस्थांना, शाळेच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य करतात. यामुळे संपूर्ण देशात त्यांचा नावलौकिक झाला आहे.यावरून ज्यांचा कोणी वाली नाही त्यांच्यासाठी सचिन धुमाळ आहेत हे असल्याचे दिसून आले आणि वृद्धाश्रमातील निराधार मायबापांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून जनुकाही कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेत उभा राहिलेला मसिहा सचीन धुमाळ यांच्या रुपाने पाहावयास मिळाला.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page