Tuesday, May 21, 2024
Google search engine
Homeगावाकडची बातमीसिटीजन वेल्फेअर असोसिएशन चा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा
spot_img
spot_img

सिटीजन वेल्फेअर असोसिएशन चा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 

बदलापूर(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)

सिटीजन वेल्फेअर असोसिएशन या समाजसेवी संस्थेचा तिसरा वर्धापन दिन रविवार दिनांक 12 मे रोजी शहरातील प्रतिष्ठित, नागरिकांच्या उपस्थितीत ध्रुव अकॅडमी , स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र , बदलापूर येथे संपन्न झाला.

संस्थेचे जेष्ठ सदस्य  विलास साळगावकर यांनी उपस्थित नागरिकांचे स्वागत केले .

संस्थेचे सचिव राजेंद्र नरसाळे यांनी उपस्थितांना संस्थेच्या कामाची माहिती दिली .ज्येष्ठ समाजसेवक  बाळासाहेब सावंत यांच्या प्रेरणेने आम्ही सर्व लोक एकत्र आलो आणि मागच्या तीन वर्षात संस्थेने विधायक मार्गाने , बदलापूरच्या पुराचा प्रश्न , सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न , उंच इमारतींसाठी आवश्यक असणाऱ्या अग्निशामन दलाच्या शिडीचा प्रश्न , रस्त्यावर बसणारे फेरीवाले, स्काय वॉक, वैद्यकीय सुविधा इत्यादी अनेक सामाजिक प्रश्नांसंदर्भात प्रशासनाशी पत्रव्यवहार करून, प्रशासनावर दबाव आणला व त्याचा सकारात्मक परिणामही दिसला याची माहिती राजेंद्र नरसाळे यांनी उपस्थितांना दिली .

 

याप्रसंगी उपस्थित असलेले ध्रुव अकॅडमी चे संस्थापक  महेश सावंत यांनी अशा प्रकारच्या नागरी संस्थांच्या कार्याचे महत्त्व उपस्थितांना समजावले . राजकीय-प्रशासकीय अनास्था आणि अ-व्यवस्था याविरुद्धचा लढा महाराष्ट्रात नवीन नाही. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या संत ज्ञानेश्वर ,तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यासारख्या अनेक महामानवांनी प्रस्थापित व्यवस्थेतील अनागोंदी विरुद्ध आवाज उठविला आणि निद्रिस्त घाबरलेल्या, दबलेल्या जनतेला जागृत संघटित केले . आत्ताही हे अशक्य नाही पण त्यासाठी या महान ऐतिहासिक वारशाचा अभिमान सांगणाऱ्या, विचारक्षम समाजाने एकत्रित येणे आवश्यक आहे . इतर कसे चुकले याच्यावर बोलण्यापेक्षा मी काय केले किंवा मी काय करू शकतो याचा विचार होणं आवश्यक आहे असे मत त्यांनी मांडले.

 

संस्थेचे सदस्य डॉ.अमितकुमार गोईलकर यांनी नागरिकांना जागृत राहण्याचे आवाहन केले.फक्त मतदान करून आपले प्रश्न सुटणार नाहीत. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी नागरिकांनी जागृत राहिले पाहिजे , कायद्यांचा अभ्यास केला पाहिजे , प्रशासनास प्रसंगी प्रश्न विचारायला पाहिजेत. बरेच लोक अधिकाऱ्यांवर, नगरसेवकांवर टीका करतात ते योग्यच आहे परंतु त्याचबरोबर झालेल्या कामांमध्ये, त्यात झालेल्या गैर व्यवहारांवर आपण लक्ष ठेवतो का ? नागरिक म्हणून ती जबाबदारी आपलीच आहे . सिटीझन वेल्फेअर असोसिएशन मध्ये आपण सर्वसामिल व्हा, आपण एकत्रितपणे हे काम करू असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

 

याप्रसंगी ज्येष्ठ पर्यावरण प्रेमी नाना देशमुख उपस्थित होते. वेगाने आणि अस्ताव्यस्तपणे वाढणाऱ्या बदलापूर शहरात , नदी- नाल्यांचा मात्र ऱ्हास होतोय . बदलापूर शहराचे सौंदर्य ओरबाडले जात आहे . पण नागरिक म्हणून आपण सारे थंड आहोत अशी तक्रार त्यांनी केली . बदलापूर शहरातील बदलते विदारक चित्र मांडतानाच , ज्या शहराने आपल्याला आईप्रमाणे मायेचे पांघरून दिले , त्या शहराचे रक्षण करण्याची जबाबदारी आपलीच आहे . आजच्या या मातृदिनी आपण अशी शपथ घेऊया असे कळकळीचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले .

 

सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष  सुनील दळवी यांच्या वतीने संस्थेचे ज्येष्ठ सदस्य  दिलीप नारकर यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले .भ्रष्ट राजकीय व्यवस्था आणि बेजबाबदार प्रशासन यांनी एकत्रितपणे चालविलेल्या भ्रष्टाचाराचे विदारक चित्र त्यांनी मांडले.

वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये अनेक नागरी समस्या निर्माण होत आहेत . या नागरी समस्या संदर्भात जनजागृती करणे , आणि लोकसहभागाने विधायक मार्गाने विविध नागरिक समस्यांचे निराकरण करणे या उद्देशाने 2021 यावर्षी बदलापूर शहरातील निवृत्त अधिकारी व सामाजिक कार्याची आवड असलेल्या लोकांनी एकत्र येऊन सिटीझन वेल्फेअर असोसिएशन या संस्थेची स्थापना केली . प्रत्येकाने आपापल्या परीने या कार्यात सहभाग घेतल्यास अनेक प्रश्नांची सोडवणूक केली जाऊ शकते ,यासाठीच आपण मोठ्या संख्येने या कार्यात सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले .

 

या कार्यक्रमाच्या निमित्ताने निस्वार्थ वृत्तीने सामाजिक कार्य करणारे ज्येष्ठ पत्रकार गुरुनाथ तिरपनकर , तसेच संस्थेच्या प्रत्येक कामात सहभागी असणाऱ्या सुवर्णा इस्वलकर मॅडम यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

नविन आलेल्या सदस्यांचे व्यासपीठावरील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आकर्षक फुलांचे रोपटे प्रदान करुन सत्कार करण्यात आला.

 

या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपाध्यक्ष  विलास हंकारे, सुहास सावंत , सुवर्णा इस्वलकर , दीपक वायंगणकर , श्री मंगेश सावंत , ज्येष्ठ पत्रकार गुरुनाथ तिरपणकर , इत्यादी संस्थेचे पदाधिकारी तसेच निवृत्त पोलीस अधिकारी जगदीश सावंत , दिलीप शिरसाट ,अनिल पंडित , अनेक वरिष्ठ निवृत्त अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते .

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page