Tuesday, May 21, 2024
Google search engine
HomeMaharashtra policeमूर्तिजापूरात घरफोडी, लुटमारीचे प्रमाण जास्त अन् पोलीस प्रशासन सुस्त...!
spot_img
spot_img

मूर्तिजापूरात घरफोडी, लुटमारीचे प्रमाण जास्त अन् पोलीस प्रशासन सुस्त…!

 

मूर्तिजापूर – शहराच्या परिसरातील वाढत्या घरफोड्या,जबरी चोऱ्या,मारहाणी,जनावरे चोरी तसेच वाहनचोऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी मूर्तिजापूर शहर पोलीस कमकुवत पडत असल्याचे दिसत असून गेल्या काही दिवसात मूर्तिजापूर शहरात गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात कमालीची वाढ झाल्याने येथील शहर पोलीस प्रशासनाच्या व ठाणेदार यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे होत आहे.तर पोलीस प्रशासन मात्र फक्त हातावर हात देऊन बसले असल्याची चर्चेला शहरात उधाण आले असून ठाणेदार भाऊराव घुगे यांचा आपल्या कर्मचाऱ्यांवर व शहरातील गुन्हेगारांवर वचक कमी पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

“सदरक्षणाय खलनिग्रहणाय” हे ब्रीदवाक्य म्हणून येणाऱ्या पोलिसांच्या नाकावर टिचून चोरटे शहरात धुमाकूळ घालत असल्याचे नुकत्याच शहर झालेल्या चोरीच्या घटनांवरून दिसून येत आहे.रात्रीच्या वेळी शहरातील पोलिसांची गस्त असून ७ मे रोजी रात्री आपले दुकान बंद करून दुकानातील मिळकत घरी घेऊन जाणाऱ्या एका प्रतिष्ठित व्यवसायिकाला त्याची दुचाकी अडवून त्याला मारहाण करत त्याच्या जवळील भली मोठी रक्कम दोन लुटारूंनी लुटण्याचा प्रकार तर शहरातील दोन प्रतिष्ठान फोडून जबर चोरीचा प्रकार घडवत चक्क शहरात दहशत पसरवनारी घटना आहे.घरावर पराक ठेऊन घरात कुणी नसल्याचे दिसताच घर बंद असेल तर ते फुटण्याचा किंव्हा दरोडा पडण्याचा प्रकार नेहमीचाच झाला असून वाहने,गुरे चोरून नेण्याच्याही घटनेत प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे.या सर्व चोरट्यांवर शहर पोलिसांचा व ठाणेदारांचा कुठलाही वचक राहिला नाही की,चोरी,घरफोडी,दरोडे,लुटमारी,वाहन चोरीचे जणू शहर पोलिसांनी परवानेच चोरट्यांना दिले की काय?असा संताप जनक नागरिकांमधून चर्चा होत आहे. स्टेशन विभाग स्थित राहणारे पत्रकार अन्वर खान यांच्या कोठ्यातून अंदाजे ५० हजार रुपये किमतीच्या ७ ते ८ बकऱ्या आपल्या घरा समोरून चोरट्यांनी भर दुपारी लंपास केल्या.मात्र याकडे जातीने लक्ष देऊन चोरट्यांचा शोध घेण्या ऐवजी शहर पोलिस मात्र अवैद्य गुटखा माफिया,वरली मटका, अवैध दारू व्यवसायिकांकडून हप्ते वसुली पोलिसांकडून मोठ्या जोमात सुरू आहे.जणू हप्ते वसुलीच्या शर्यती मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशनचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक लागतो की काय? शहरा लगत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील काही बार,हॉटेल रात्री अपरात्री २ ये ३ वाजेपर्यंत सुरू असतात.मात्र यावर कायवाई करण्या ऐवजी रात्रीच्या वेळी ड्युटीवर व गस्तीवर असलेले पोलीस आपला हिस्सा व मध्यपेय जेवण करण्या करीता शहरातील एका बार वर कोणाची भीती न बाळगता पोलिसांच्या गणवेशातच रात्री १२:३० ते १ च्या सुमारास दिसून येतात.जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी आकस्मित रात्रीच्या वेळी तपासणी केल्यास काही पोलीस कर्मचारी मध्यधुंद अवस्थेत अथवा पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरी टेबल वर झोपलेले दिसून येतील.यामुळे मात्र मूर्तिजापूर पोलीस आपल्या कर्तव्यावर कितपत निष्ठावान आहेत.हे दिसून येत आहे.शहरात होत असलेल्या घरफोड्या,वाहने चोरी आदी गंभीर गुन्हाचे छळा लावून गुन्हेगारांवर कारवाई करण्याची नागरिकांकडून जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मागणी होत आहे.

 

मूर्तिजापूर शहरातील व्यापारी सुरक्षित राहिला नसून रात्री प्रतिष्ठान बंद करून घरी जात असतांना केव्हा काय घडेल याची खात्री राहिली नाही, शहरातील दुकाने फुटण्याचे प्रमाण वाढले असून यावर त्वरित कारवाई करून छडा लावावा असे निवेदन आम्ही संघटनेच्या वतीने आमदार, उपविभागीय पोलीस अधिकारी व जिल्हा पोलीस अधिकारी यांना दिले असून रात्रीच्या वेळी आपले दुकान फुटेल का या धाकापोटी रात्रीची झोपही उडाली आहे”.

अशोक भावनानी ,  अध्यक्ष व्यापारी महासंघ मूर्तिजापूर.

 

काही दिवसांपूर्वी झालेल्या लूटमारीच्या प्रकारातील आरोपीचा तपास घेण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. या आरोपीना जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच त्याचा छडा लागेल, एकूणच चोऱ्या, घरफोड्या, तूटमारीच्या प्रकारांना आटोक्यात आणण्यासाठी पोलिस प्रशासन शर्थीचे प्रयत्न करेल, गस्त वाढविण्यत येईल. क्यूआर कोडचे पॉईंट वारंवार तपासल्या जातील. लोकांनी आपल्या भागात अनोळखी इसम दिसला, तर त्याला हटकावे व पोलिसांना कळवावे”.

भाऊराव घुगे,   ठाणेदार,शहर पोलीस स्टेशन मूर्तिजापूर

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page