Tuesday, May 21, 2024
Google search engine
Homeभारतकष्टकरी शेतकरी संघटनेचा मुंबईत महाविकास आघाडीला पाठिंबा
spot_img
spot_img

कष्टकरी शेतकरी संघटनेचा मुंबईत महाविकास आघाडीला पाठिंबा

कष्टकरी शेतकरी संघटनेचा मुंबईत महाविकास आघाडीला पाठिंबा

 

मुंबई : भारत जोडो अभियान – निर्धार महाराष्ट्र हा जबाबदार नागरिकांचा तसेच संविधान व लोकशाही संरक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या संस्था संघटनाचा मंच आहे. येत्या 20 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत लोकशाही विरोधी, संविधान विरोधी भाजपा महायुतीला पराभूत करुन महाविकास आघाडीच्या उमेदवारास मतदान करण्यासाठी समाजातील विविध जाती धर्मातील व वर्गातील घटकांना प्रोत्साहित कारण्याचे कार्य भारत जोडो अभियान करते आहे. भारत जोडो अभियानाच्या या कार्यास जनतेतून खूप पाठिंबा मिळत आहे, त्यात आज मुंबई तसेच मुंबई जवळील आदिवासी समाज बांधवांच्या कष्टकरी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे, श्रमिक मुक्ती आंदोलन, महाराष्ट्र आदिवासी मंच व कष्टकरी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल लाड यांची नुकतीच उत्तर मुंबईचे भारत जोडो अभियानाचे समन्वयक आशुतोष शिर्के, प्रमोद शिंदे, किरण जाधव यांच्या सोबत चर्चा झाली. चर्चेनंतर विठ्ठल लाड यांनी सांगितले की, “महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार या मूळे देश भरातील सामान्य माणूस त्रस्त आहे आणि सत्ताधारी मात्र मस्त मजेत आहेत. त्यामूळे सर्वांनी आपला भारतीय तिरंगा लक्षात ठेवून लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करून कुशासन घालवून सूशासन आणूया, हा देश आपला आहे त्याला सूरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपली आहे म्हणून सर्वांनी जबाबदारीने मतदान करूया …

यासाठी भारत जोडो अभियानाचे मुंबई समन्वयक सीताराम शेलार यांनी विठ्ठल लाड यांचे आभार मानले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page