Tuesday, May 21, 2024
Google search engine
Homeगावाकडची बातमीभारतीय दलित पॅन्थर चा उत्तर मुंबईत महाविकास आघाडीला पाठिंबा
spot_img
spot_img

भारतीय दलित पॅन्थर चा उत्तर मुंबईत महाविकास आघाडीला पाठिंबा

 

मुंबई : भारत जोडो अभियान – निर्धार महाराष्ट्र हा जबाबदार नागरिकांचा तसेच संविधान व लोकशाही संरक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या संस्था संघटनाचा मंच आहे. येत्या 20 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत लोकशाही विरोधी, संविधान विरोधी भाजपा मित्र पक्षाच्या शक्तीला पराभूत करुन महाविकास आघाडीच्या उमेदवारास मतदान करण्यासाठी समाजातील विविध जाती धर्मातील घटकांना प्रोत्साहित कारण्याचे कार्य भारत जोडो अभियान करते आहे. भारत जोडो अभियानाच्या या कार्यास जनतेतून खूप पाठिंबा मिळत आहे, त्यात आज भारतीय दलित पॅन्थर ने भारत जोडो अभियानास पाठिंबा पाठिंबा जाहीर केला आहे, भारतीय दलित पॅन्थर चे मुंबई प्रदेश अध्यक्ष अपरांत कांबळे यांनी नुकतीच उत्तर मुंबईतील भारत जोडो अभियानाच्या बैठकीत उपस्थिती दर्शवली व बैठकीनंतर यांनी सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर जे ज्या संविधान समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते ते संविधान व त्यातून मिळालेल्या लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही भारत जोडो अभियानासोबत आहोत, तसेच यासाठीच भाजपा महायुतीला विरोध करत महाविकास आघाडीच्या उमेदवारास आम्ही भारतीय दलित पॅन्थर मार्फत मतदान करण्याचे जाहीर करतो.”

यासाठी भारत जोडो अभियानाचे उत्तर मुंबई समन्वयक आशुतोष शिर्के, प्रमोद शिंदे व घनश्याम देटके यांनी त्यांचे आभार मानले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page