Tuesday, May 21, 2024
Google search engine
HomeMaharashtra policeशहरात चोरट्यांचा धुमाकुळ कायम ; जनसामान्यांसह व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण
spot_img
spot_img

शहरात चोरट्यांचा धुमाकुळ कायम ; जनसामान्यांसह व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

शहरात चोरट्यांचा धुमाकुळ कायम ; जनसामान्यांसह व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

 

ठाणेदार म्हणतात लुटारूंना अटक केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अन् त्याच रात्री पाच चोरट्यांनी पोलीस स्टेशन समोरील दुकान फोडून चार लाख लुटून सलामी दिली.    

मूर्तिजापूर – शहर पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेले दुकानच चोरट्यांनी फोडले आहे. सोमवारी १३ मे च्या रात्री ही घटना घडली. या चोरीत चोरट्यांनी अंदाजे रोख रक्कम ३ लाख ८३ हजाराची चोरी केली आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी भर रस्त्यावर रात्री चोरट्यांनी व्यावसायिकाला दीड लाखाने लुटल्याची घटना ताजी असतानाच,शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे यांनी प्रसार माध्यमांवरील वृत्तांकनामुळे लुटारूंना जेरबंद केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे आव्हान स्वीकारले असे वृत्त प्रकाशित झाले अन् त्याच रात्री पाच चोरट्यांनी जणू काही पोलिसांना आम्ही चोरी करण्यासाठी सक्रिय आहे अशी सलामी दिली. ठाकूर बोअरवेल्स अँड हार्डवेअरचे दुकान फोडून लाखो रुपये चोरी केल्याची घटना पुन्हा घडली.

या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याआधीच्या अनेक चोरीच्या घटनेमुळे मूर्तिजापूरकर त्रस्त आहे. त्यातील एकाही प्रकरणाचा छडा पोलिसांना लावता आला नाही. त्यातच आता पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच चोरीची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलीस प्रशासनाकडून तरी मूर्तिजापूरकरांना चोरट्यांपासून दिलासा मिळणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. न्यायालय,उपविभागीय अधिकारी कार्यालयासह तहसील व पंचायत समिती कार्यालय असलेल्या मुख्य रस्त्यावर शहर पोलीस स्टेशनच्या समोरासमोर असलेल्या ठाकूर बोअरवेल्स अँड हार्डवेअरचे दुकान मालक उदयसिंह पोहरसिंह राजपूत हे १३ मे च्या रात्री ९ वाजताच्या सुमारास ते आपले काम आटपून दुकान बंद करून घरी निघून गेले.रात्रीची संधी साधत अज्ञात चोरट्याने दुकानाचे कुलूप तोडून शटर उचकटून व्यवसायातून आलेले सुमारे ३ लाख ८३ हजाराची रोख स्वरूपातील नगदी चोरून नेल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. शहर पोलिसांकडून रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे.

असे असतानाही चोरट्यांनी पोलिसांच्या नाकावर टिचून पोलीस ठाण्याच्या काही अंतरावरील मुख्य मार्गावर असलेल्या ठाकूर बोअरवेल्स हार्डवेअरच्या दुकानावर डल्ला मारला.हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. यामध्ये एकूण चार ते पाच चोरटे असल्याचे समजले.सकाळी चोरी झाल्याची घटना उघडकीस येताच प्रभारी ठाणेदार ए.के. वडतकर यांनी पोलीस स्टॉपसह घटनास्थळाकडे धाव घेतली घटनास्थळी पंचनामा प्रक्रिया सुरू होती. श्वान पथक व फॉरेन्सिक तपास सुरू केला होता.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page