Monday, June 24, 2024
Google search engine
Homeमहाराष्ट्रऍड. असिम सरोदे व विश्वबर चौधरी आज कांदिवली चारकोप मध्ये
spot_img
spot_img

ऍड. असिम सरोदे व विश्वबर चौधरी आज कांदिवली चारकोप मध्ये

 

ऍड. असिम सरोदे व विश्वबर चौधरी आज कांदिवली चारकोप मध्ये

 

मुंबई : भारत जोडो अभियान – निर्धार महाराष्ट्र हा जबाबदार नागरिकांचा तसेच संविधान व लोकशाही संरक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या संस्था संघटनाचा मंच आहे. येत्या 20 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत लोकशाही विरोधी, संविधान विरोधी भाजपा मित्र पक्षाच्या शक्तीला पराभूत करुन घटनात्मक मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी निर्भयपणे मतदान करण्यासाठी समाजातील विविध जाती धर्मातील व वर्गातील घटकांना प्रोत्साहित कारण्याचे कार्य भारत जोडो अभियान- निर्भय बनो करते आहे.

 

यासाठीच उत्तर मुंबईतील सह्याद्री नगर, गणेश मंदिर मागील मैदान चारकोप, कांदिवली येथे शुक्रवार दिनांक 17 मे रोजी सायंकाळी 7 वाजता निर्भय बनो ची सभा आयोजित केलेली आहे, या सभेस ऍड. असिम सरोदे व विश्वबर चौधरी मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड मधील नागरिकांनी जास्त संख्येने संपूर्ण परिवारासह उपस्थित राहावे, असे आवाहन भारत जोडो अभियान चे उत्तर मुंबई समन्वयक आशुतोष शिर्के, प्रमोद शिंदे आणि घनश्याम देटके यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page