Monday, June 24, 2024
Google search engine
HomeMaharashtra policeमूर्तिजापूर परीसरात घडलेल्या चोऱ्याचा छडा लवकरच लावण्यात येईल - जिल्हा पोलिस अधीक्षक
spot_img
spot_img

मूर्तिजापूर परीसरात घडलेल्या चोऱ्याचा छडा लवकरच लावण्यात येईल – जिल्हा पोलिस अधीक्षक

मूर्तिजापूर परीसरात घडलेल्या चोऱ्याचा छडा लवकरच लावण्यात येईल – जिल्हा पोलिस अधीक्षक

 

चोरी व लुटमार झालेल्या घटनास्थळी भेट

 

मूर्तिजापूर – शहरात चोरटयांनी विविध ठिकाणी चोरी व लुटमार करुण अक्षरशः शहरातली व्यावसायिक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने येथिल सर्वसामान्य नागरिक व व्यापारी वर्ग दहशतीत असल्याने आज जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी शहरात चोरी व लुटमार झालेल्या ठिकाणी आपल्या ताफ्यासाह, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे,शहर पोलिस स्टेशन चे प्रभारी ठाणेदार अनंत वडतकर,ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत, पी एस आय सूर्यवंशी यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी करून व्यावसायिकांना दिलासा देत सदर घटनेतील आरोपी लवकरच पोलीसांच्या जाळ्यात अडकणार असल्याचे माहिती दिली.

जिल्हा पोलिस अधीक्षक यांना गुप्ता वाईन शॉप येथे आकस्मिक भेट देऊन पाहणी केली व राजेश गुप्ता यांच्या कडून घडलेल्या प्रकार समजून घेऊन त्याच्या जवळील रोख रक्कम घेऊन पसार झालेल्या घटनेची सविस्तर माहिती घेतली तसेच येथिल जागृत देवरण मारूती देवस्थान चे हनुमानाच्या चांदीचे मुकूट लंपास झालेल्या घटना स्थळी भेट देवून संस्थेचे अध्यक्ष दर्शन उपाध्ये व शहर पोलिस स्टेशन समोर असलेल्या ठाकूर बोअरवेल व हार्डवेरच्या दुकानाचे शटर तोडून रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली त्या ठिकाणी भेट देवून प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेत व्यावसायिकांना दिलासा दिला.

 

“शहरात घडलेल्या घटनेचा लवकरच छडा लावून आरोपी गजाआड करण्यात येतील. तसेच नागरिकांना व व्यवसायिकांना घाबरण्याची गरज नसून रात्रीच्या वेळी अधिक पोलीसांची पेट्रोलिंग वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.”

 बच्चन सिंह , जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page