Monday, June 24, 2024
Google search engine
Homeअकोलादोनशे रूग्णांनी घेतला मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचा लाभ ; पन्नास रुग्णांची होणार...
spot_img
spot_img

दोनशे रूग्णांनी घेतला मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचा लाभ ; पन्नास रुग्णांची होणार शस्त्रक्रिया

 

मुर्तिजापूर – येथील महाराष्ट्रीयन हिंदी भाषी समाज बहुउद्देशीय संस्था मुर्तिजापूरच्या यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सुरजरतन फतेहचंद दम्माणी जनहित निधी आपातापा रोड अकोला, रोटरी क्लब ऑफ बाॅम्बे हैगींग गार्डन, दम्माणी नेत्र रुग्णालय अकोला यांच्या वतीने मुर्तिजापूर भक्तीधाम मंदिर पटवारी काॅलनी समता नगर येथे दि.16 मे 2024 रोजी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि चश्मा वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेशचंद्र कुर्मी सर तर उद्घाटक म्हणून दम्माणी नेत्र रुग्णालयाचे व्यवस्थापक व संचालक सभापती शुक्ला यांची उपस्थिती होती.आयोजीत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व चश्मा वाटप शिबीराला विशेष अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष तथा महाराष्ट्रीयन हिंदी भाषी समाज बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष द्वारकाप्रसाद रामदास दुबे, अकोला जिल्हा दुध उत्पादक संघ प्रशांत हजारी, समाजसेवक गुलाबचंद दुबे, कैलाश महाजन,मा.नगरसेवक वैभव यादव,मा.नगरसेवीका संध्याताई दुबे,राधा तिवारी, अनिता देवीकर,भुपेंद्र शुक्ला, रितेश सबाजकर, जगदीश कुंभेकर, अमोल प्रजापती, सर्प मित्र मुन्ना श्रीवास, जवाहरलाल पातालबंसी, चंद्रकांत तिवारी,शालीकराम यादव, रमेश गुप्ता यांची उपस्थिती होती.महाराष्ट्रीयन हिंदी भाषी बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून व सुरजरतन फतेहचंद दम्माणी नेत्र रुग्णालयाचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि चश्मा वाटप शिबीराला मुर्तिजापूर शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी या शिबीराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.दुपारी 1 वाजेपर्यंत 200 रूग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आले. यामधुन ज्या गरजु रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करावयाची असल्यास त्यांना दिलेल्या तारखेला सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत दम्माणी नेत्र रुग्णालय आपातापा रोड अकोला येथे प्रत्येक्ष हजर राहून शस्त्रक्रिया करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.शस्त्रक्रियेसाठी 50 रूग्णांची तपासणी करून नोंद करण्यात आली आहे.यामधुन निवडक रूग्णांची शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्रीयन हिंदी भाषी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अध्यक्ष द्वारकाप्रसाद रामदास दुबे यांनी दिली आहे.शिबीरात 200 चशम्यांचे वितरण करण्यात आले आहे.आयोजीत शिबीराचे संयोजक अशोक मदनलाल दुबे हे होते.शिबीराची सुरुवात दिप प्रज्वलन करून करण्यात आली.यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेच्या वतीने करण्यात आले.मंचावरील सर्व उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.प्रास्तावीक अशोक कुमार दुबे यांनी केले.तर संचालन संजय जयस्वाल व आभार प्रदर्शन संस्था अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी केले.शिबीरात दम्माणी नेत्र रुग्णालयाचे डॉ.अजय देशमुख, दत्तात्रय पवार, डॉ.अमोल केडीया , सुभाष मोहोड,सुनिल सरोदे यांनी रूग्णांची तपासणी केली.शिबीराला मोठ्या प्रमाणात शहर व ग्रामीण भागातील नागरीक उपस्थित होते.शिबीर यशस्वीतेसाठी संयोजक अशोक कुमार दुबे, माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे, संजय जयस्वाल, रमेश गुप्ता,सनत दुबे, मुन्ना श्रीवास, विशाल गुप्ता, जवाहरलाल पातालबंसी, अभय पांडे, संजय गुप्ता, किशोर ठाकूर, डॉ.अरपण दुबे,शालीकराम यादव,केवल यादव, डॉ.प्रविण पालीवाल, अँड.भारत जमादार, रितेश सबाजकर, मुन्ना गुप्ता,माजी नगरसेवक सुनील महादेवराव पवार,रवि राठी, पत्रकार प्रकाश श्रीवास, शिवदास तिरकर,भुपेंद्र शुक्ला,शाम आपोतीकर,ममता पांडे,राधा तिवारी,राम बजाज,गौरव ठाकरे,आयुष तिवारी, शैलेश जयस्वाल, हरी प्रसाद दुबे,जगदीश कुंभेकर,गजानन दुरतकर,सनत दुबे, अमोल प्रजापती,संजय देवीकर,आनंद गुप्ता, सुभाष ठाकूर, संतोष दुबे उमेश तिवारी आदी महाराष्ट्रीयन हिंदी भाषी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व सभासद व सदस्य यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page