Monday, June 24, 2024
Google search engine
Homeगावाकडची बातमीगांधी पीस फाउंडेशन नेपाळच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान सोहळा नाशिक येथे...
spot_img
spot_img

गांधी पीस फाउंडेशन नेपाळच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान सोहळा नाशिक येथे संपन्न

नाशिक जिल्हा प्रतिनिधी डॉ श्याम जाधव

नाशिक येथील नाईस संकुल सभागृहात, 13मे 2024 रोजी गांधी पीस फाउंडेशन नेपाळचे संस्थापक अध्यक्ष डॉ. लालबहादूर राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय विविध कार्य करणाऱ्या गुणीजनांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले .

या कार्यक्रमास स्वामी श्रीकंठनंद जागुत भारत अभियान व मराठी अभिनेत्री सौ. स्मिता प्रभु व गांधी पीस फाउंडेशन नेपाळ भारताचे प्रभारी डॉ. सूनिलसिंह परदेशी आदी मान्यवर प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थितीत होते.

प्रास्ताविक डॉक्टर सुनील सिंह परदेशी यांनी केले तर मनोगत स्वामी श्रीकठंनंद यांनी केलं व पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या.

संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रात केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याची दखल घेऊन डॉ.सौ. सखी ललित बत्तासे यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली.

गांधी पीस फाउंडेशन नेपाळ आणि कर्तव्यदक्ष फाउंडेशन भारत यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ह्यावेळी आयोजक डॉ. विरेंद्रसिंग टिळे, डॉ.राजेंद्र आहेर डॉ. रोहिणी ताई कुमावत डॉ .आरती अहिरे डॉ. राजेंद्र लिंबकर, डॉ. सिमा पंडीत डॉ.संदीप काकड , जयंत देशमुख रुपाली तांबारे व कर्तव्यदक्ष फाऊंडेशन महिला टिम सर्व पदाधिकारी डॉ आरती ताई अहिरे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल कदम सर व यांनी केले.

नाशिक येथील कार्यक्रमात ३१ मान्यवरांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली गेली व गांधी पिस नोबेल अवार्ड डॉ.नेहा किशोर जोशी यांना व गांधी पिस इंन्टरनॅशनल अॅबेस्टेर मेंबरशीप मिळाल्याबद्दल पुरस्कारार्थींनी आनंद व्यक्त करून आपल्यावर सामाजिक जबाबदारी वाढली असल्याचे मनोगत व्यक्त केले त्यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page