Monday, June 24, 2024
Google search engine
Homeगावाकडची बातमीलोणार सरोवर विकास आराखडा आढावा बैठक;आराखड्यातंर्गत सुरू असलेली कामे कालमर्यादेत पूर्ण करा...
spot_img
spot_img

लोणार सरोवर विकास आराखडा आढावा बैठक;आराखड्यातंर्गत सुरू असलेली कामे कालमर्यादेत पूर्ण करा – विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांचे निर्देश

 

लोणार सरोवर विकास आराखडा आढावा बैठक;आराखड्यातंर्गत सुरू असलेली कामे कालमर्यादेत पूर्ण करा – विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांचे निर्देश

 

अमरावती : लोणार विकास आराखड्यांतर्गत कामे प्रगतीपथावर असून शासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार कामे कालमर्यादेत पूर्ण करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांनी दिले.

लोणार सरोवर विकास आराखडा आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठचे कुलगुरु डॉ. मिलिंद बाराहाते, पर्यटन विभागाचे शैलेंद्र बोरसे, बुलडाणाचे उपमुख्य वनसंरक्षक सुशांत पाटील व उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी दूरदृष्य प्रणालीव्दारे उपस्थित होते.तर उपायुक्त संजय पवार, हर्षद चौधरी, विशेष कार्य अधिकारी सुशील आग्रेकर, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा आदी यावेळी उपस्थित होते.

Oplus_131072

श्रीमती पाण्डेय म्हणाल्या की, बेसॉल्ट खडकात उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर बेसाल्ट प्रकारच्या खडकातील हे सर्वात मोठे सरोवर असून या ऐतिहासिक स्थळाला मोठ्या संख्येने देश विदेशातील पर्यटक, संशोधक भेट देत असतात. अशा जैवविविधतेने संपन्न असलेल्या लोणार सरोवराचे जतन, संवर्धन व विकासासाठी शासनाने विकास आराखडा मंजूर केला आहे. विकास आराखड्यानुसार प्रस्तावित असलेले कामे कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी सर्व यंत्रणेने जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. तसेच विकास आराखड्यांतर्गत येणारी लोणार सरोवर व परिसरातील नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावीत, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

 

त्या पुढे म्हणाल्या की, सरोवर परिसरातील ‘ईको टुरिझम’चे काम पूर्णत्वास जाण्यासाठी पर्यटन विभाग व वनविभागाने जबाबदारीपूर्वक प्रयत्न करावे. लोणार सरोवराला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आवश्यक सुविधांची उभारण्याची कामे गतीने पूर्ण करावी. पार्कीग व्यवस्था, सुशोभिकरण, पोलीस चौकी तसेच खाजगी जागेचे भुसंपादन असे विविध कामे गतीने पूर्ण करावी. पूर्णत्वास गेलेल्या कामांचा अहवाल तातडीने सादर करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.

 

विद्यापीठाकडून उभारण्यात येणाऱ्या लोणार विज्ञान केंद्र व संशोधन प्रयोगशाळेसंदर्भातील कामाचा आढावा घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रयोगशाळेकरिता आवश्यक निधी व मनुष्यबळ मागणीचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठवून त्याचा सातत्याने पाठपुरावा करावा. तसेच लोणार सरोवरचे संशोधन करणाऱ्यांना नियमानुसार विनाविलंब परवानगी द्यावी, असेही निर्देश श्रीमती पांडेय यांनी यावेळी दिले.

 

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page