Monday, June 24, 2024
Google search engine
Homeगावाकडची बातमीसूर्य आग ओकू लागल्याने नागरिक हैराण ! अतनुरात रस्ते निर्मनुष्य..! ऊन आणि...
spot_img
spot_img

सूर्य आग ओकू लागल्याने नागरिक हैराण ! अतनुरात रस्ते निर्मनुष्य..! ऊन आणि पावसाच्या खेळानंही हैराण! एक युवक गंभीर ; देवदुत म्हणून आले डॉ.माधव चंबुले..!

सूर्य आग ओकू लागल्याने नागरिक हैराण ! अतनुरात रस्ते निर्मनुष्य..! ऊन आणि पावसाच्या खेळानंही हैराण! एक युवक गंभीर ; देवदुत म्हणून आले डॉ.माधव चंबुले..!

 

अतनूर : जळकोट तालुक्यातील अतनूर परिसरात वातावरणातील तापमानात चांगलीच वाढ झाली असल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे घामाघुम झालेले नागरिक, मजुर, शेतमजूर दुपारच्यावेळी सावलीचा आधार घेऊन विश्रांती घेत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे.

उष्णतेमुळे चिमुकली बालके, रूग्ण, सामान्य नागरिक, वयोवृद्ध नागरीक हैराण झाले आहेत.

गेल्या दोन दिवसापूर्वीच संजीवन समाधी सोहळा निमित्ताने श्री. घाळेप्पा स्वामी महाराज यांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व भागवत गाथा पारायणाचे आयोजन केलेले होते. त्यात गावातील महाविद्यालयीन वारकरी संप्रदायातील महाविद्यालयीन तरुण ओमकार पाटील हा सक्रिय सहभाग घेऊन पारायण वाचन, वीना व इतर सेवासुविधे करिता भक्तगण म्हणून ग्रामस्थ म्हणून झटत होता. त्या दिवशी मंदिरात दुपारी बैठक संपली तो आपल्या घराकडे निघाला असता.

दि.१८ रोजी दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी गावातील १८ वर्षीय नवतरुण होतकरू महाविद्यालयीन युवक ओमकार पाटील ऊन्हातुन मंदीरांकडुन घराकडे येत असताना त्याला ऊन्हाचा जबरदस्त तडाख्याने गंभीर जखमीने जागेवर कोसळून मळमळ, उलटीने हातपाय वाकडे-तिकडे करित प्रकृती गंभीर व चिंताजनक होत असतानाच येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. पण येथे मोठ्मोठ्या औषधोपचाराची सुविधा उपलब्ध नसल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ.आर्शिया सय्यद यांनी तात्पुरते औषधोपचार करून गंभीर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी तात्काळ उदगीर ला रेफर केले. असता त्वरित समाजसेवी कोविड-१९ काळातील आरोग्य देवदूत डॉ.माधव वीरप्पा चंबुले यांनी गंभीर रुग्णांवर त्वरित औषधोपचार करून जीवदान दिले. याबद्दल अतनूर जिवंतपणी समाधी घेतलेले संजिवनी श्री.घाळेप्पा स्वामी महाराज व श्री.काशी विश्वनाथ महादेव पवित्र पावन भुमीतील पंचक्रोशीत त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

तसेच वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकत आहेत. लग्न समारंभाची धामधूम सुरु असतानाच सूर्य आग ओकू लागला असल्याने प्रचंड उकाडा जाणवत आहे. उन्हाच्या चटक्यामुळे नागरिकांचा मात्र चांगलाच घाम निघत आहे. भर दुपारी ११ ते ५ वाजेदरम्यान रस्त्या वरील वाहतूक मंदावत आहे. अतनुरातील व्यापारी पेठांमध्ये शुकशुकाट जाणवत असून रस्ते निर्मनुष्य होत आहेत. या काळात नागरिक घरात राहणे पसंत करत आहेत. उन्हाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी मोटार सायकलस्वार डोक्यावर हेल्मेट, स्कार्प, रुमाल बांधूनच बाहेर पडत आहेत.

उन्हाचा पारा चढल्याने वीजेची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दुपारच्या वेळी ग्रामीण भागातील वीज गुल होत असल्याने नागरिकांना प्रचंड उकाडा सहन करावा लागत आहे. काही कामानिमित्त घराबाहेर पडलेले नागरीक उन्हाचा चटका सहन केल्यानंतर रसवंतीगृह, शीतपेयाची ठिकाणे शोधत आहेत. सकाळपासूनच अंगातून लाहीलाही होत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचा इशारा आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page