Monday, June 24, 2024
Google search engine
Homeगावाकडची बातमीशेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी, राज्यात मान्सूनची वेळेपूर्वीच हजेरी ..!
spot_img
spot_img

शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी, राज्यात मान्सूनची वेळेपूर्वीच हजेरी ..!

शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी, राज्यात मान्सूनची वेळेपूर्वीच हजेरी ..!

 

हवामानतज्ज्ञ अनुपम कश्यपि यांची माहिती.

• यंदा सरासरी १०६ % पाऊस राहणार असल्याचा अंदाज.

 

मूर्तिजापूर :- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सूनची वाटचाल वेळेपूर्वी सुरु आहे. नैत्रऋत्य मोसमी वारे (मान्सून) वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार आहे. मान्सूनची वाटचाल अशीच राहिली, तर यंदा वेळेपूर्वी मान्सून दाखल होण्याची दाट शक्यता आहे. मान्सून २० मे (सोमवार ) पर्यंत अंदमानात दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर आनंद झळकणार आहे. मागील वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे यंदा मान्सून वेळेवर येणार असल्याने शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

केरळ मध्ये यंदा ३१ मेपर्यंत मान्सून पोहोचणार आहे, अशी माहिती माजी हवामानतज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपि यांनी दिली. अवकाळी पावसाचा जोर कमी होत असतानाच मान्सून सुरू होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी नांगरट, पाळी घालून पेरणीयोग्य तयारी करावी. मात्र, १०० मिमी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये. अवकाळी वा वळवाच्या पावसाच्या जोरावर पेरणी करण्याचे धाडस शेतकऱ्यांनी करू नये. असे त्यांनी सांगितले.

दक्षिण बंगालच्या उपसागरात निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मान्सूनच्या हालचाली दिसून येत आहे. दरवर्षी मान्सून २२ मे पर्यंत दाखल होतो. सध्या दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर समुद्र सपाटीपासून १ ते १.५ किलोमीटर उंचीवर नैऋत्येकडून येणारे वारे सुरु आहे. हे वारे मान्सून येणार असल्याची सूचना देतात. पुढील दोन दिवसांत अंदमान बेट आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनची अधिक प्रगती होणार आहे.

 

     केरळमध्ये होणार आगमन

नैऋत्य मोसमी वारे देशाच्या महासागरीय क्षेत्रात म्हणजेच बंगालच्या उपसागरात दस्तक देणार आहे. यामुळे १ जून रोजी सरासरी तारखेला देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे केरळला मान्सून येणार आहे. बंगालच्या उपसागरात मान्सूनची वाटचाल कशी राहिल, यावर १ जूनची तारीख निश्चित ठरवली जाणार आहे.

  यंदा होणार दमदार पाऊस

अवकाळी पाऊस २० मे पर्यंत कायम राहणार आहे. २० मे नंतर अवकाळी पावसाचे वातावरण कमी होणार आहे. यंदा पाऊस सरासरीपेक्षा जास्त होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने एप्रिलमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. यंदा पाऊस १०६% राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यानंतर पुन्हा में महिन्याचा शेवटी सुधारित अंदाज व्यक्त करणार आहे.

 

मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पाऊस..!

बिहार आणि झारखंडसह अनेक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. दरम्यान, आयएमडीने ताज्या अलर्टमध्ये म्हटले आहे की सध्या कर्नाटकमध्ये चक्रीवादळ सक्रीय आहे. त्यामुळे पुढील ५ दिवसांत मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्‌याचा वारा (४०-६० किमी प्रतितास) यासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page