Wednesday, October 9, 2024
Google search engine
Homeगाव-सहेलीअल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर क्राईम आणि कॉमेडी चित्रपटांचा धमाका
spot_img
spot_img

अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर क्राईम आणि कॉमेडी चित्रपटांचा धमाका

 

अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर क्राईम आणि कॉमेडी चित्रपटांचा धमाका

आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी अल्ट्रा झकास मे महिन्यात दोन जबरदस्त चित्रपट घेऊन येत आहे. क्राईम आणि रहस्याने भरलेला साऊथचा डब चित्रपट ‘अभ्युहम’ म्हणजेच ‘संभ्रम’ २४ मे २०२४ आणि हसून हसून पोट दुखेल असा हॉलीवुड डब कॉमेडी चित्रपट ‘टायगर रोबर्स’ म्हणजेच ‘चोरीचा मामला’ ३१ मे २०२४ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

संभ्रम चित्रपटात आपले वडील निर्दोष आहेत हे कळाल्यावर जयंत त्यांना तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी पुरावांचा शोध घेऊ लागतो तर दुसरीकडे चोरीचा मामला चित्रपटात एका वाघीणीचे अपहरण होते तेव्हा तिचा आईसारखा सांभाळ करणारी एक स्त्री एका एजन्सीची मदत घेते. जयंतचे वडील तुरुंगातून सुटतील की नाही आणि वाघीण सापडते की नाही हे त्या त्या चित्रपटात रंजकपणे कळणार आहे.

“भाषेचे सर्व अडथळे तोडून दोन वेगळ्या संस्कृतींचे चित्रपट मराठी भाषेत प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून देताना अत्यंत आनंद होत आहे. रसिक प्रेक्षकांना दोन्ही चित्रपट नक्कीच आवडतील अशी आशा आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ.  सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

 

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page