Sunday, July 14, 2024
Google search engine
Homeअकोलाब्रम्हीचा विनय जामनिक झळकला नेपाळच्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत
spot_img
spot_img

ब्रम्हीचा विनय जामनिक झळकला नेपाळच्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत

 

 

मूर्तिजापूर – नेपाळमधील छापा येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत येथील परमानंद मालाणी शाळेतील पाचवीचा विद्यार्थी विनय मिलींद जामनिक याने सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. 

      क्रीडा क्षेत्रात नावलौकिक प्राप्त येथील एम बी कराटेची चमू नेपाळ मध्ये संपन्न झालेल्या शितो रिई कराटे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्यानंतर एम बी कराटेचे संचालक सेंसई गंगाधर जाधव यांच्या नेतृत्वात येथील विविध शाळांचे विद्यार्थी या स्पर्धेत ३१ मे व १ जून रोजी सहभागी झाले. या स्पर्धेत आपल्या अतुलनीय कौशल्याचे प्रदर्शन करून विनय ने घवघवीत यश संपादन केले.आपल्या यशाचं श्रेय त्याने वडील पत्रकार मिलींद जामनिक,आई शिल्पा जामनिक आजी गयाबाई जामनिक, आत्या, आत्येमामा, भाऊ मुख्याध्यापक,शिक्षक प्रशिक्षक सेंसई गंगाधर जाधव यांना दिले. त्याच्या यशाबद्दल त्याचे जेष्ठ पत्रकार प्रा.अविनाश बेलाडकर, गजानन इंगळे, ॲड नितीन जामनिक,रोहीत सोळंके, डॉ. आशिष चक्रनारायण,सचीन आंबेकर,बंडू जामनिक वैभव लकडे यांनी अभिनंदन केले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page