Sunday, July 14, 2024
Google search engine
Homeअकोलाएम बी कराटेच्या चमुची गगनभरारी ; पाच गोल्ड मेडलसह चौदा बन्स मेडलला...
spot_img
spot_img

एम बी कराटेच्या चमुची गगनभरारी ; पाच गोल्ड मेडलसह चौदा बन्स मेडलला घातली गवसनी

नेपाळच्या १० व्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत देशासह महाराष्ट्र राज्याचा राखला मान 

 

मूर्तिजापूर – नेपाळच्या छापा शहरात पार पडलेल्या १० व्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत मूर्तिजापूरच्या एम बी कराटेच्या चमूनी गगनभरारी घेत पाच गोल्ड मेडलसह चौदा बन्स मेडलला गवसनी घालून देशासह महाराष्ट्र राज्याची मान उंचावला आहे.

        सदरची स्पर्धा शितो रिई कराटे स्कुल व्दारा आयोजित मयुर कप २०२४ , दहावी आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पीयनशीप नेपाळच्या छापा या शहरात पार पडली आहे या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी मूर्तिजापूरच्या एम बी कराटेचे संचालक सेसंई गंगाधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहरासह तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थी एकुण १९ खेडाळूनी सहभाग घेतला होता.त्यापैकी विनय जामनिक,उत्कर्ष गावंडे, कर्तव्य अग्रवाल,आदित्य बोळे,दक्ष अग्रवाल या पाच खेडाळूंनी उत्कृष्ठ कामगिरी करत गोल्ड मेडल बळकावले आहे तर उर्वरीत आलोक इंगळे, वृषभ कोकाटे,सागर कांबळे,आलोक इंगळे,श्रृती चव्हाण, श्रीजे रोकडे, राजवीर अनभोरे,विनय मोरे, देवांश भांडे, आनंद भदे, दिव्या थोरात, श्रावस्ती पंडीत, रियांश माकोडे, युवराज साखरे या खेडाळूंनी आपल्यातील कलेचे उत्तम प्रदर्शन करत बन्स मेडलला गवसनी घालत आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये देशासह महाराष्ट्र राज्याची मान उंचावली आहे. यात पाच गोल्ड मेडल व चौदा बन्स मेडल असे एकुण एकोनविस मेडल प्राप्त केले आहेत.याचे सर्व श्रेय एम बी कराटेचे संचालक सेसंई गंगाधर जाधव, आई-वडिल आणि आपआपल्या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक यांना देत आहेत.

            मायदेशी म्हणजेच मूर्तिजापूरात पोहचल्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व विजयी खेडाळू व प्रशिक्षक यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. खेडाळूनी केलेल्या उत्तम कामगीरीने मूर्तिजापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याने सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

स्वसंरक्षणासहसह आरोग्याच्या दृष्टीने व शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी कराटेच्या क्लाससह स्पर्धेत सहभागी होणे विद्यार्थ्यांसाठी ही एक काळाजी गरज आहे त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा.

सेंसई गंगाधर जाधव, संचालक

एम बी कराटे, मूर्तिजापूर

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page