मूर्तिजापूर – कराटेच्या विविध ठिकाणी संपन्न झालेल्या स्पर्धेत खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले अशा विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
मूर्तिजापूरातल्या एम बी कराटे क्लासचे संचालक सेसंई गंगाधर जाधव यांच्या मार्गदर्शनात तालुका, जिल्हा ,राज्य आंतरराष्ट्रीय अशा विविध ठिकाणी स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत कराटेच्या तालुक्यासह शहरातल्या विविध शाळेचे विद्यार्थी सहभागी होऊन घवघवीत असे यश संपादन करत पाच सुवर्ण पदक व चौदा बंन्स पदकाची कमाई केली त्याबद्दल त्यांचा एम बी कराटे क्लासच्या मैदानावर भव्य असा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पि.आर.पटेरिया ,कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग मूर्तिजापूर यांच्या हस्ते विनय जामनिक,उत्कर्ष गावंडे, कर्तव्य अग्रवाल,आदित्य बोळे,दक्ष अग्रवाल,आलोक इंगळे, वृषभ कोकाटे,सागर कांबळे,आलोक इंगळे,श्रृती चव्हाण, श्रीजे रोकडे, राजवीर अनभोरे,विनय मोरे, देवांश भांडे, आनंद भदे, दिव्या थोरात, श्रावस्ती पंडीत, रियांश माकोडे, युवराज साखरे या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.श्री पटेरिया यांनी सदर विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी मूर्तिजापूर क्रीडा नगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असे गौरवो उद्गार काढले.
यावेळी कराटे क्लासचे संचालक सेसंई गंगाधर जाधव, संतोष भांडे ,वैभव गोठे व धनंजय वेरूळकर स्थापत्य अभियांत्रिकी सहायक सार्वजनिक बांधकाम उपविभाग, सतीश इंगळे यांच्यासह बहुसंख्य पालक वर्ग उपस्थित होते.