Sunday, July 14, 2024
Google search engine
Homeगाव-सहेलीसेमी इंग्रजी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून फिस घेतल्यास शाळांवर कारवाई होणार
spot_img
spot_img

सेमी इंग्रजी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून फिस घेतल्यास शाळांवर कारवाई होणार

सेमी इंग्रजी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून फिस घेतल्यास शाळांवर कारवाई होणार

 

किनवट , अनिल बंगाळे : सेमी इंग्रजी शाळेत शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्यानुसार विनाशुल्क प्रवेश मिळालाच पाहिजे. जर प्राथमिक व माध्यमिक शाळेत प्रवेशासाठी अनुदानित शाळा विद्यार्थ्यांकडून फिस वसूल करीत असेल तर तशा शाळेविरुद्ध आरटीई कायद्यानुसार कायदेशिर कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्र किनवट पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व खाजगी अनुदानित शाळांना पाठवले आहे. पालकांनी त्यांच्या पाल्याच्या प्रवेशासाठी कोणती शाळा फिस घेतल्या शिवाय प्रवेश देत नसेल तर किनवटच्या शिक्षण विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन देखिल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
किनवट पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील ज्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी शिक्षणासाठी विद्यार्थी प्रवेशासाठी येत असतील तर त्यांना मोफत शिक्षण मिळालेच पाहिजे हा त्यांचा शिक्षण
हक्क कायद्यानुसार हक्क बनतो. मुलांचे शिक्षण सुनिश्चीत करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार आर्थिक भार उचलत असते. त्यामुळे फिस देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरीसुद्धा कांही शाळा फिसच्या नावाखाली अडवणूक करीत असल्याच्या पालकांच्या तक्रारीवरुन गटशिक्षण अधिकाऱ्यांनी ७ जून रोजी शाळांना पत्र बजावले आहे. सेमी इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी फिसच्या सबबीखाली कोणीही आर्थिक व्यवहार करु नये असेही त्या पत्रात नमूद आहे. शिक्षणाचा अधिकार ही आपल्या संविधानाची कृती आहे. शिक्षण हक्क कायदा २००९, ज्याला आरटीई कायदा २००९ म्हणूनही ओळखले जाते. भारताच्या संसदेने ४ ऑगस्ट २००९ रोजी हा पारित केला आणि १ एप्रिल २०१० रोजी लागू सुद्धा झाला. हे भारतीय राज्यघटनेच्या कलम २१(ए) अंतर्गत मुलांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण प्रदान करेल. या कायद्यामुळे देशात शिक्षण हा मूलभूत अधिकार बनला आहे. शिक्षण हक्क कायद्यामुळे गरिबातील गरीब विद्यार्थी सुद्धा आता सेमी इंग्रजी या माध्यमाला मोफत प्रवेश घेऊ शकतात.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page