Sunday, July 14, 2024
Google search engine
Homeअकोलाअनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस ; नाले तुडुंब ,रस्ता वाहून गेल्याने नागरीकांची अडचण
spot_img
spot_img

अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस ; नाले तुडुंब ,रस्ता वाहून गेल्याने नागरीकांची अडचण

 

मूर्तिजापूर – तालुक्यातील कानडी धोत्रा परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली, कानडी, निंभा, मोहखेड परिसरामध्ये सतत एक तास मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचा वातावरण निर्माण झाले आहे तर दुसरीकडे मूर्तिजापूर पिंजर रोड वरील मोहखेड नजीक असलेल्या नाल्याला पूर आल्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक थांबली, आधीच पुल शिकस्त झाल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने, बाजूला तात्पुरता रस्ता वाहतूकी करिता तयार करून दिला होता.

परंतु आज झालेल्या प्रचंड पाऊस आल्याने पुराच्या पाण्यात तोही रस्ता वाहून गेला, त्यामुळे त्या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. मूर्तिजापूर तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता असल्यामुळे. बऱ्याच गावाचा संपर्क तुटला आहे. त्याच बरोबर तालुक्यातील ग्राम निंभा धोत्रा कमळणी येथे सतत एक तास सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धोत्रा ते निंभा मार्गांवरील कमळगंगा नदी ला पूर आल्याने ये-जा करणाऱ्यांना एक तास खोळंबून राहावे लागले. या पुरामुळे भले मोठे बाभळीचे झाड रोडवर वाहू आल्यामुळे येण्या – जाण्याचा मार्ग बंद झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली.

वाहतूकीस बंद करण्यात आलेल्या पुलाच्या बाजूचा रस्ता वाहून गेल्याने पिंजर पासून ते मोझर, घोटा, विरहित कानडी. धोत्रा निंभा या गावातील नागरीकांना मूर्तिजापूरला अनेक किलोमीटरचा फेरा घेऊन यावे लागणार आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page