Sunday, July 14, 2024
Google search engine
Homeअकोलामूर्तिजापूरात अभाविपचे विदर्भ स्तरीय अभ्यास वर्गाचे आयोजन ; २३ जिल्ह्यातून विद्यार्थी सहभागी...
spot_img
spot_img

मूर्तिजापूरात अभाविपचे विदर्भ स्तरीय अभ्यास वर्गाचे आयोजन ; २३ जिल्ह्यातून विद्यार्थी सहभागी होणार…!

पत्रकार परिषदेत विदर्भ प्रांत मंत्री पायल किनाके यांची माहिती 

 

मूर्तिजापूर – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत कार्यकारिणी बैठक १६ व १७ जून २०२४ रोजी प्रभ लॉन, चिखली रोड, मूर्तिजापूर, येथे संपन्न होणार असल्याची माहिती विदर्भ प्रांत मंत्री पायल किनाके यांनी १५ जुन रोजी पत्रकार परिषदेत दिली.

याबैठकीत विद्यार्थी परिषद दृष्टया २३ जिल्ह्यातील – १५२ कार्यकर्ते अपेक्षित आहे. या दोन दिवसीय बैठकीत विदर्भातील शैक्षणिक व सामाजिक वर्तमान परिस्थितीवर चर्चा तसेच आगामी कार्यक्रम, आंदोलन, उपक्रमांवर चर्चा व निर्णय होतील. यामध्ये विशेषतः आगामी राष्ट्रीय विद्यार्थी दिन विदर्भ प्रांतातील सर्व घोषित शाखा, संपर्क स्थान व विस्तार केंद्रांवर मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येईल. विदर्भ प्रांताचे शैक्षणिक सत्र २०२४-२५ चे संघटनात्मक लक्ष १५० शाखा, १५५ संपर्क स्थान, ७४६ विस्तार केंद्र, ८६५ महाविद्यालय कार्यकारिणी व ३३९ वसतिगृह समिती एवढे आहे. तसेच यावर्षी विदर्भ प्रांतात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेद्वारे १ लाख ४५ हजार ९९० एवढे सदस्यतेचे लक्ष ठेवण्यात आले आहे. सोबतच अभाविप विदर्भ प्रांत अभ्यास वर्ग १७ ते २० जून २०२४ रोजी प्रभ लॉन, मूर्तिजापूर येथे पार पडणार आहे. ज्यामध्ये विदर्भ प्रांतातील ३४६ कार्यकर्ते सहभाग घेतील. कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाकरिता व सर्वांगीण विकासाकरिता या वर्गाचे आयोजन करण्यात येत असते. या बैठकीत व अभ्यास वर्गात अभाविप राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल, राष्ट्रीय सह संघटनमंत्री एस. बालकृष्ण, पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री देवदत्त जोशी, विदर्भ प्रांत अध्यक्ष प्रा. नितिन गुप्ता, विदर्भ प्रांत मंत्री पायल किनाके, विदर्भ प्रांत संघटनमंत्री विक्रमजीत कलाने, विदर्भ प्रांतातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page