Sunday, July 14, 2024
Google search engine
Homeकोल्हापूरबकरी ईदनिमित्त फुलला जनावरांचा बाजार..!
spot_img
spot_img

बकरी ईदनिमित्त फुलला जनावरांचा बाजार..!

बकरी ईदनिमित्त फुलला जनावरांचा बाजार..

 

मुस्लिम धर्मियांचा सण सोमवारी बकरी ईद असल्यामुळे कोल्हापुरातील वडगावमधील जनावरांच्या बाजारात मोठ्या प्रमाणात बोकड आणि शेळ्यांची मोठी आवक पहायला मिळाली. बाजारात अन्य जनावरांच्या तुलनेत बकऱ्यांचा मोठा बाजार भरला होता. या बाजारात बिटल, शिरुर, कवठेमहांकाळ, आटपाडी, कच्ची, अंडील अशा विविध जातींचे पालवे, बोकड विक्रीसाठी आले होते. याचा व्यापार करण्यासाठी व्यापारी, शेतकरी यांनी गर्दी केली होती.

   व्यापारासाठी रत्नागिरी, आटपाडी, मिरज, जत-माडग्याळ, सातारा, रहिमतपूर, पलूस अशा विविध भागांतून खरेदी-विक्रीसाठी शेतकरी, व्यापारी आले होते. बाजाराच्या आवारात पूर्वेस हा बाजार भरतो. पहाटेपासून बाजार सुरू झाला. बकरी मोठ्या प्रमाणात येऊनही खरेदीदारांची संख्या कमी होती. त्यामुळे बकऱ्यांच्या किमती कमालीच्या कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

वडगाव बाजार समितीमध्ये भरलेल्या बाजारात वेगवेगळ्या जातींच्या बकऱ्यांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. या बाजारात अठरा लाख किमतीचा डोक्यावर चाँद असणारा वैशिष्ट्यपूर्ण देशी बोकड विक्रीसाठी आला होता.

       याला सात लाख किमतीस मागणी झाली; परंतु त्याचा व्यवहार झाला नाही. या बाजारात बकऱ्यांची आवक जास्त व खरेदीदारांची संख्या कमी असल्यामुळे बकऱ्यांचा दर ढासळला.या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे बाजारात सर्वाधिक किमतीचा बोकड विक्रीसाठी आला होता. नामदेव तुकाराम आवळेकर (रा. बोमनाळ, ता. अथणी, जि. बेळगाव) यांनी पालन केलेला बोकड लोकांचे खास आकर्षण ठरला. तीन वर्षे वयाचा बोकड असून जवळ जवळ पंच्याहत्तर किलो वजन आहे.

या बोकडाच्या कपाळावर चाँद असल्यामुळे त्याची किंमत अठरा लाख होती. त्याला एका व्यापाऱ्याने सात लाखास मागणी केली. परंतु व्यवहार झाला नाही. त्याची खास सोय असून वडगावच्या बाजारात विक्री न झाल्यास मिरज, कराड, मुंबईच्या बाजारात त्याला विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याचे सांगितले.

     मुंबईला त्याला चांगला दर मिळेल, अशी अशा आहे. त्याच्या मालकाने हलगीच्या तालावर त्याची बाजारातून मिरवणूक काढली होती..

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page