Sunday, July 14, 2024
Google search engine
HomeMaharashtra policeपत्रकार अजय प्रभे यांच्यावर अवैद्य पेट्रोल माफियांनी केला जिवघेणा हल्ला..!
spot_img
spot_img

पत्रकार अजय प्रभे यांच्यावर अवैद्य पेट्रोल माफियांनी केला जिवघेणा हल्ला..!

 

मूर्तिजापूर – पत्रकारांवरील वाढते हल्ले लक्षात घेऊन पत्रकार आणि प्रसारमाध्यम संस्थांना संरक्षण देणारं विधेयक नुकतेच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत मंजूर करण्यात आले असले तरी यावर कुठलीही अंमलबजावणी होत नसल्याने माफी्यांचे मनोबल वाढले असल्याचे दिसत आहे. 

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील एका दैनिकाच्या प्रतिनिधी वर पेट्रोल माफि्यांनी अमानुष मारहाण केल्याची घटना आज दि. १६ जून रोजी दुपारी ४ ते ४.३० वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील दाळंबी-कोळंबी नजिकच्या रॉयल धाब्यावर घडली.

Oplus_131072

मूर्तिजापूर येथील एका वृत्तपत्राचे प्रतिनिधी अजय प्रभे यांच्या वर रविवार दि. १६ जून रोजी मूर्तिजापूर तालुक्यातील दाळंबी-कोळंबी नजिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ लगत असलेल्या रॉयल धाब्या वर पेट्रोल माफियांनी अमानुष मारहाण केली यात पत्रकार अजय प्रभे व त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले. त्यांना मूर्तिजापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर असलेल्या दाळंबी-कोळंबी नजीक रॉयल धाब्यावर गायगाव पेट्रोल डिझेल डेपो येथून जाणाऱ्या पेट्रोल व डिझेलच्या टँकर मधून पेट्रोल व डिझेल ची मोठ्या प्रमाणात तस्करी केल्या जाते. या कडे कोणाचे लक्ष लागू नये म्हणून नुसतेच नावापुर्ती देखावा करण्याकरीता सदर धाबा चालकाने धाबा लावला असला तरी या मागील रहस्य हे म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पेट्रोल व डिझेलचे तस्करी केल्या जात असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे या काळ्या धंद्याची पोलिसांनाही माहिती असूनही केवळ बोरगाव पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणात सदर पेट्रोल डिझेल माफियांकडून दर महिन्याकाठी मोठ्या रकमेची पाकिटे मिळत असल्यानेच पोलीस मुकगीळत अंध असल्याचा देखावा करत असल्यानेच या माफीयांचा मज्जा वाढला असल्याचेही नागरिकांनी सांगितले आहे. पत्रकार अजय प्रभे हे बोरगाव वरून लग्न समारंभ आटपून आपल्या दैनिकाच्या जाहिरातीची वसुलीची रक्कम घेऊन मूर्तिजापूर च्या दिशेने आपल्या सहकार्यासोबत येत असताना वाटेतच त्यांच्या सहकार्याने पाणी पिण्याकरिता रॉयल धाबा येथे गेले असता पत्रकार अजय प्रभे यांना सदर धाब्यावर पेट्रोल व डिझेलचे चोरी होत असताना आढळले. त्यांनी या सर्वांची आपल्या मोबाईल मध्ये फोटो व व्हिडिओ बातमी करता घेत असताना, रॉयल धाब्याचे मालक व तेथील त्यांच्या सहकार्यांनी प्रभे यांना जातीवादक अश्लील शिवीगाळ करत अमानुष मारहाण केली व त्यांचा मोबाईल ही फोडून टाकला यात अजय प्रभे व त्यांच्या सहकार्यास गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. 

नुकताच राज्याच्या विधानसभेत मंजूर करण्यात आलेला पत्रकार माध्यमांवर हल्ला करणाऱ्यास तीन वर्षाचा कारावास किंवा ५० हजार रुपये दंड किंवा दोन्हीही पत्रकारांवरील हल्ला करणे हे दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा मानल्या जातो.

अश्या शिक्षाच्या संदर्भात नुकताच राज्याच्या विधिमंडळात कायदा अंमलनात आला असला तरी सुद्धा वारंवार पत्रकारांवर माफियांकडून होत असलेल्या हल्ल्याबाबत पोलीस सदर कायद्या अंतर्गत कारवाई का बर करत नाहीत.?

हा एक यक्ष प्रश्नच पत्रकारांना पडला असून सदर घटनेची बोरगाव पोलीस काय गांभीर्याने घेऊन या पेट्रोल माफियांच्या मुसक्या आवळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page