Sunday, July 14, 2024
Google search engine
Homeअमरावतीशेतकऱ्यांच्या,व्यापाऱ्यांच्या धान्याची नासाडी करणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीला बरखास्त करा - शेतकरी...
spot_img
spot_img

शेतकऱ्यांच्या,व्यापाऱ्यांच्या धान्याची नासाडी करणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीला बरखास्त करा – शेतकरी संघर्ष समितीची एकमुखी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याचे चोरी गेलेले धान्य प्रकरण आर्थिक अपहार करून मॅनेज करणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीला बरखास्त करा 

अवकाळी पावसामुळे हजारो क्विंटल शेतकऱ्यांच्या,व्यापाऱ्यांच्या धान्याची नासाडी करणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीला बरखास्त करा – शेतकरी संघर्ष समितीची एकमुखी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी…
 जिल्हाधिकारी तसेच आमदार रवि राणा यांना दि. 18/ 6 /2024 रोजी शेतकरी संघर्ष समितीचे शिष्ट मंडळाने भेटून आपल्या मागण्याचे निवेदन दिले.
शिवनी रसूलपुर ता.नांदगाव खंडेश्वर येथील शेतकरी उमेश बनसोड यांची अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीतून धान्य चोरी गेल्याप्रकरणी सदर प्रकरण आर्थिक देवाण-घेवाण करून मॅनेज करण्याचे सभापती एपीएमसी व काही लोकांनी केल्याप्रकरणी संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची एकमुखी मागणी शेतकरी संघर्ष समितीने केली.

        तसेच अन्यायग्रस्त शेतकरी उमेश बनसोड यांनी आपला रीतसर खुलासा माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दाखल केला.
          शेतकरी संघर्ष समितीचे नेते प्रकाश साबळे,शेखर अवघड,मंगेश इंगोले, रुपेश कळसकर, सुधीर बोबडे, योगेश देशमुख, उमेश महेंगे, अमित कुचे व शिवनी रसूलपुर येथील शेतकरी उमेश बनसोड प्रामुख्याने उपस्थित होते.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page