Sunday, July 14, 2024
Google search engine
Homeअमरावतीराजर्षी छत्रपती शाहु महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील...
spot_img
spot_img

राजर्षी छत्रपती शाहु महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मुला-मुलींना अर्ज करण्यास अंतिम मुदत

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मुला-मुलींना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका व पी.एच.डी. साठी विविध अभ्यासक्रमांचे उच्च शिक्षणासाठी राजर्षी छत्रपती शाहु महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत सन २०२४-२५ साठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी शासनाने मंजुरी दिलेली आहे.

याबाबत शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडींमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.१२ जुलै, २०२४ पर्यंत देण्यात आलेली आहे.

राजर्षी छत्रपती शाहु महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या अटी व शर्ती आणि लाभाचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे…👇

⚡अटी व शर्ती लाभाचे स्वरूप⚡

 विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा.

 विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.८.०० लक्ष इतके मर्यादित असावे.

QS World Ranking नुसार ज्या विद्यापीठांचे नामांकन २०० च्या आत आहे, त्या विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात येईल.

 या योजनेंतर्गत दरवर्षी राज्यातील ७५ विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येईल.

  परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ७५% गुणांसहित पदवी परीक्षा उतीर्ण केलेली असावी.

   पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ७५% गुणांसहित पदव्युत्तर पदवी परीक्षा उतीर्ण केलेली असावी.

 शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी ३०% मुलींसाठी राखीव असतील.  

 निवडीसंदर्भातील अन्य अटी व शर्ती ह्या जाहिराती मध्ये नमूद केल्यानुसार व शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दि.३०.१०.२०२३ व शासन निर्णय नियोजन विभाग दि.२०.०७.२०२३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे राहतील. * सर्वसाधारण पदव्युत्तर पदवीसाठी २ वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल व पदव्युत्तर पदविकासाठी १ वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल त्या अभ्यासक्रमासाठी नजीकच्या मार्गाने इकॉनॉमी क्लास विमान भाडे परतीच्या भाड्यासह, शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा यासह एका विद्यार्थ्यांमागे प्रतिवर्षी रू.३०.०० लाखाच्या मर्यादेत.

    तर पीएचडी अभ्यासक्रमासाठी ४ वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल त्या अभ्यासक्रमासाठी नजीकच्या मार्गाने इकॉनॉमी क्लास विमान भाडे परतीच्या भाड्यासह, शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा यासह एका विद्यार्थ्यांमागे प्रतिवर्षी रू. ४०.०० लाखाच्या मर्यादेत.

 प्रवेश घेतलेल्या संबंधित शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेल्या अथवा भारत सरकारच्या DOPT विभागाने विदेशी शिष्यवृत्तीसाठी ठरवून दिलेल्या दराप्रमाणे येणारा खर्च भारत सरकारच्या इंडियन ओव्हरसिज स्कॉलरशिप या योजनेअंतर्गत देण्यात येत असलेल्या दरवर्षी यु.एस.ए. व इतर देशांसाठी (यु.के. वगळून) १५४०० यु.एस.डॉलर्स आणि यु.के. साठी ९९०० जीबीपी इतक्या रक्कमेच्या मर्यादेत निर्वाह भत्ता संबंधित विद्यार्थ्यांच्या परदेशातील वैयक्तिक खात्यामध्ये जमा केला जाईल. सदर निर्वाह भत्याची रक्कम ही उपरोक्त नमूद पदव्युत्तर पदवी/पदविका असलेल्या प्रतिवर्षी रु.३०.०० लाखाच्या व पीएचडी असलेल्या प्रतिवर्षी रु. ४०.०० लाखाच्या मर्यादेमध्ये अंतर्भूत आहे.       

परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्जाचा नमुना, शिष्यवृत्तीसाठी पात्रतेच्या अन्य महत्वाच्या अटी व शर्ती इ.सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडींमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच संबंधित जिल्हयाचे सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय व प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, अमरावती यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.  

या योजनेस इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील परिपुर्ण भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दि.१२ जुलै, २०२४ पर्यंत वेळ सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत पोस्टाने किंवा समक्ष समाज कल्याण आयुक्तालय, ३, चर्च रोड, पुणे-४११००१ येथे सादर करावा असे आवाहन सुनिल वारे, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, अमरावती यांनी केले आहे.  

 

    (सुनिल वारे)प्रादेशिक उपायुक्त,

समाज कल्याण विभाग, अमरावती

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page