Sunday, July 14, 2024
Google search engine
HomeMaharashtra policeआरोग्य विभागाच्या उदासिनतेमुळे राज्यभरात तोतया बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट...!
spot_img
spot_img

आरोग्य विभागाच्या उदासिनतेमुळे राज्यभरात तोतया बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट…!

अकोला शहरातच लोकांच्या जीवाशी खेळणारे शंभरावर डॉक्टर; लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ कारवाईची मागणी करणार..

संजय देशमुख विशेष वृत्त 

अकोला : मानवी स्वास्थाचे रक्षण होऊन रोगमुक्त निरोगी समाजाची निर्मिती व्हावी यासाठी अनेक मानवतावादी, पोषक जीवनशैलीचे प्रसारक आरोग्यसेवक, योगगुरू आणि संवेदनशील हितचिंतक डॉक्टर्स प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणारे बिना डीग्रीचे अनेक बोगस, बेईमान डॉक्टर, अर्धवट ज्ञानाच्या आधारे समाजजीवनाशी खेळण्याच्या दुकानदाऱ्या करीत आहेत. या तोतया बोगस पिलावळीला आरोग्य शाखाचे कोणतेही ज्ञान नसतांना अंदाज पंचे दाहोदशे या सुत्राने हे लोक महागड्या आणि मुदतबाह्य झालेल्या औषधांचा भडीमार करून आणखी काही वर्ष वाचणाऱ्या रूग्णांची आयुष्ये हिरावून घेण्याचे अमानविय कारनामे करीत आहेत. मुळात ही महागडी औषधे यांचकडे पोहचली कोठून हा प्रश्न चिंतनिय असून याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. क्वचित एखादी दोन कारवाई सोडली तर या बोगस डॉक्टरांकडे आरोग्य विभागाचे जाणीवपूर्वक आणि अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याची चर्चा सामाजिक चिंतनशील गटांमध्ये सध्या सुरू आहे.

एकट्या अकोला शहरात बिना डिग्रीचे १०० पेक्षा जास्त तोतये डॉक्टर काम करीत असून या व तंबू टाकून बसणाऱ्या या अनेक लोणीखाऊ बोगस बोक्यांमुळे अनेक लोकांच्या जिवीताला हानी पोहचलेली आहे. अकोला शहरातील कार्यवाही बाबत महानगरपालिकेचा आरोग्य विभाग वेळकाढूपणा करीत आहे. समाजाचेच घटक असलेले हे डॉक्टर अनेकांचे जीव जाईपर्यंत या नकली डॉक्टरांना सांभाळत राहणार का असे प्रश्न समाजातील चिंतनशील लोकांकडून विचारले जात आहेत. अज्ञानी लोकांची वाढणारी गर्दी आणि दुष्परिणाम जाणवल्यावरही तक्रारी न करण्याच्या वृत्तीमुळे असे मलिदालाटू नकली वैद्य शहर आणि गावागावात भुईछत्र्यांप्रमाणे पसरलेले आहेत. यातील काही जण शहरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये उजळ माथ्याने काम करतात. असे डॉक्टरांची मेडीकल दुकाने सुध्दा असून जिल्ह्यातील बरेच दवाखाण्यातूनच औषध विक्री करतात.

त्यांना औषधे पुरविणारे व्यापारी कोण..? याकडे अन्न व औषध प्रशासनाने सुध्दा लक्ष दिले पाहिजे

   तक्रारी तक्रारकर्त्यालाच उलट सुलट प्रश्न विचारून जबाबदारी झटकण्याचे काम आरोग्य विभागातील काही महाभाग करीत असून उलट या बोगस नातेवाईकांना सांभाळण्यासाठी एखादी धाड पडण्यापूर्वीच त्याला सावध करण्याचे समाजद्रोही पापी कामे कारनामे अनेक महानगरपालिका आणि ग्रामपंचायतीचा मधील भ्रष्ट फितुरांकडून केल्या जात असल्याचे महाभयंकर सत्त्य समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी बार्शिटाकळी तालूक्यातील सारकिन्ही येथे एका २० वर्षिय नकली डॉक्टरला अटक केली होती. त्यात कारवाईमध्ये पोलिसांची सक्रियता दिसली. परंतू तेथील तालुका वैद्यकिय अधिकारी रविन्द्र आर्या यांनी मात्र पोलिस त्यांच्या दिशेने काम करीत आहेत. ते माझे काम नाही. मी त्यात काही शकत नाही असे अत्यंत बेजबाबदारपणाचे स्पष्टीकरण देऊन आपली असंवेदनशीलता प्रगट केली.

तर दुसरीकडे आरोग्य विभागाचे योग्य ते सहकार्य मिळाल्यास बोगस डॉक्टरांची पाळे मुळे खोदून काढण्याचा आशावाद बार्शिटाकळीचे पोलिस निरीक्षक बंडू मेश्राम यांनी व्यक्त केला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदार वृत्तीमुळे समाजाच्या आरोग्यावर आघात करणाऱ्या या नकली डॉक्टरांवरील कार्यवाहीच्या बाबतीत आरोग्य विभागाच्या उदासिनतेचा प्रत्यय येतो. अकोला शहरातील या बोगस डॉक्टरांवर कार्यवाही करून लोकांच्या जीवाचे रक्षण व्हावे.

यासाठी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून अकोला जिल्हाधिकाऱ्यांना आणि राज्यभरातील सुळसुळाटाकडे लक्ष वेधण्यासाठी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ व लोकस्वातंत्र्य सामाजिक सेवा संघाच्या वतीने मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांना पत्र पाठवून मागणी करण्यात येणार आहे.

        अशी माहिती लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख (निंबेकर) यांनी दिली आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page