Sunday, July 14, 2024
Google search engine
Homeगावाकडची बातमीफिटनेस से एका दिवसाचं नसून ही सतत चालणारी दीर्घ प्रक्रिया आहे. जीवन...
spot_img
spot_img

फिटनेस से एका दिवसाचं नसून ही सतत चालणारी दीर्घ प्रक्रिया आहे. जीवन फसाटे 

 

 

मोर्शी (प्रतिनिधी) प्रमोद घाटे सह प्रविण पाचघरे

फिटनेस हे एका दिवसाचे नसून सतत चालणारी दीर्घ प्रक्रिया आहे. नुसतं आंतरराष्ट्रीय योग दिन आहे म्हणून एका दिवसापूरते एकत्र येऊन योग केल्याने नेहमीसाठी मनुष्य निरोगी किंवा फिटनेस मध्ये राहू शकत नाही. जर आपणास नेहमी करिता मेडिसिन ची जीवन जर जगायचे असेल तर योगा, मेडिटेशन सोबत आहारही तेवढाच महत्त्वाचे तेवढाच महत्त्वाचा असतो. कारण आपला आहारच आपली औषध आहे.

     आणि आपल्या जीवनशैलीमध्ये तथा आहारामध्ये बदल करूनच आपण नेहमी करिता फिटनेस मध्ये राहू शकतो असे उद्गार वेलनेस कोच जीवन फसाटे यांनी स्वर्गीय भाई मंगळे योगा ग्रुप नेर पिंगळाई तथा जीएम वेलनेस आणि वर्क फॉर्म होम सेंटर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने जि. प. पूर्व माध्यमिक मुलांची शाळा नेर पिंगळlई येथील शाळेच्या प्रांगणात आयोजित केलेल्या १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी काढले. कार्यक्रमाचे नियोजन वेलनेस कोच सुनील डेहनकर यांनी केले तथा प्रमुख उपस्थिती म्हणून वेलनेस कोच जया रक्षाकर हे होते.ते पुढे म्हणाले की, आम्ही गेल्या सात वर्षापासून आमच्या परिवारा मार्फत बऱ्याच व्यक्तींचे वजन नियंत्रित केले तथा त्यांच्या जीवनशैलीमध्ये बदल घडवून आणून आज ते आनंदी जीवन जगत आहे. कारण निरोगी जीवन जर जगायचे असेल तर मनुष्य मानसिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या तथा शारीरिक दृष्ट्या निरोगी असायला पाहिजे. अशीही मत याप्रसंगी फसाटे यांनी केले.

या कार्यक्रमाप्रसंगी सर्वप्रथम वेलनेस कोच जया रक्षाकर यांनी योगाचे प्रात्यक्षिक करून दाखविले व योगा बद्दल तथा व्यायामाबद्दल सविस्तर माहिती उपस्थितांना विशद केली.

तसेच याप्रसंगी वेलनेस कोच सुनील डेहनकर यांनी उपस्थितlना आपण स्वतः योगा, व्यायाम आणि सोबतच जीवनशैलीमध्ये बदल घडून आणल्यानंतर त्यांच्यात आरोग्यदृष्ट्या कुठले चांगले परिवर्तन झाले यासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी गावातील बरीच मंडळी उपस्थित होती. त्यामध्ये विनायक सोनपराते, रवी पवार, निलेश कान्होरकर, अल्पज्या फसाटे, नामदेव अडणे, सौ. मंगला मंगळे, सौ. पूनम कान्होरकर, भारती यावले, अलका बडासे, रेखा गिरे, भूषण मंगळे, मंगला माहोरे, अर्चना नालट, नलिनी राठी, गणेश हिवराळे, अमोल पोटे, प्रिया कोकाटे कांताताई फुसे, संगीता समृद्धी यावले मुळे इत्यादी सह अनेक गावकरी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page