Sunday, July 14, 2024
Google search engine
Homeगावाकडची बातमीभारताच्या प्राचीन योगाला संपुर्ण जगाने स्विकारले- आमदार डॉ. पंकज भोयर
spot_img
spot_img

भारताच्या प्राचीन योगाला संपुर्ण जगाने स्विकारले- आमदार डॉ. पंकज भोयर

जागतिक योग दिन 2024 साठीची संकल्पना ‘स्वयं और समाज के लिए योग’

 

वर्धा : आपल्या आरोग्याची काळजी केवळ योगाच घेऊ शकते, त्यामुळे योगाचे महत्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. निरोगी आयुष्य जगण्यासाठी सर्वांनी योगा करणे आवश्यक आहे. आज योग सर्वत्र पोहचला असून भारताच्या या प्राचीन योगाला संपुर्ण जगाने स्विकारले आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. पंकज भोयर यांनी आज येथे केले. 

 

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, वर्धा, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, नेहरू युवा केंद्र न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, वर्धा आणि पतंजली योग परिवार, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने महादेवपुरा येथील न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या रंग मंदीर प्रांगणात “स्वयं और समाज के लिए योग’’ या संकल्पनेवर आधारित 10 वा जागतिक योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

Oplus_131072

मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, वर्धाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानदा फणसे, जिल्हा क्रिडा अधिकारी आशा मेश्राम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रा. ज. पराडकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नितू गावंडे, नेहरू युवा केंद्राचे शिवधन शर्मा, वर्धा एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रदीप बजाज, न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या अनघा आगवण, योग प्रशिक्षक म्हणून पतंजली योग परिवाराचे राज्य प्रभारी संजीवनी माने, वर्धा जिल्हा प्रभारी प्रशांत सावरकर, वनिता चलाख, ज्योती शेटे, महादेव किनकर उपस्थित होते. 

 

 आमदार भोयर म्हणाले की, सन 2015 पासून जागतिक योग दिनाला सुरूवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी जगापुढे ठराव मांडल्यावर 171 देशांचा पाठींबा मिळाला आणि जागतिक दिनाला सुरूवात झाली. योगा ही जिवनात फार मोठी संपत्ती आहे. येणाऱ्या काळात आरोग्याची काळजी केवळ योगाच घेऊ शकते, असे त्यांनी यावेळी सांगितले. योगाला वर्धा जिल्ह्यात प्रोत्साहन देण्यासाठी 101 योग भवन उभारण्याचा आपण संकल्प केला असून त्यापैकी 21 योग भवन पुर्ण झाले असून त्यात नियमित योगाची सुरूवात झाली असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद करून उपस्थितांना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

 

मुख्य कार्यकारी अधिकारी रहमान म्हणाले की, योगा ही जिवन जगण्याची पध्दत आहे. विद्यार्थ्यांपासून ते वरिष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी योगा खूप आवश्यक आहे. संपुर्ण जग आज योगा दिन साजरा करीत आहे. भारताचा नागरिक म्हणून आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची बाब आहे. नागरिकांनी योगाचा प्रसार जास्तीत जास्त करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

यावेळी योग प्रशिक्षक म्हणून पतंजली योग परिवाराचे राज्य प्रभारी संजीवनी माने, वर्धा जिल्हा प्रभारी प्रशांत सावरकर, वनिता चलाख, ज्योती शेट्ये, महादेव किनकर यांनी नागरिकांना योगाच्या विविध आसनांचे प्रात्याक्षिक करून दाखविले. त्यात सुर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, पाडहस्तासन, भुजंग आसन, मकरासन, कपालभाती, अनुलोम विलोम प्राणायम, भामरी प्राणायम, ध्यान आदी विविध आसनांचा समावेश होता. यावेळी उपस्थित मान्यवर व नागरीकांनी योगासने केली. 

 

प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी केले. संचालन शिक्षक गोपाल बावनकर यांनी केले. तर आभार न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या अनघा आगवण यांनी मानले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरीकांनी हजेरी लावली होती.

 

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाचे क्रिडा अधिकारी अनिल निमगडे, क्रिडा मार्गदर्शक भोजराज चौधरी, क्रिडा संकुल व्यवस्थापक रवि काकडे, योगेश कुकडे, अशोक पेडेकर, न्यू इंग्लिश हायस्कुलचे विजय जुगनाके, डॉ. अजय येते, जय थोटे, मंगेश शहाकार, पुष्पा फरकाडे, किरण पांडे, संजय शेगांवकर, पतंजली योग परिवाराचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत सावरकर, जिल्हा प्रभारी महिला वनिता चलाख, दिपक भुतडा, उषा कडव, संगिता इमले, कल्पना शेंद्रे, चंदा कुंबलवार, वर्षा मारबदे, रंजीता भातकुलकर, संगीता शेंडे, ज्योती देवतारे, शारदा बन्नागरे, किशोर शेंडे, रेखा शेंडे, निलीमा इंगळे, अपर्णा इंगोले, हीरा ढबाले, छाया उखळकर, रजनी दोंदल, छाया खेकडे, कल्पना लाटकर, श्री. देशमुख, आशीष मुडे, संगीता ढोढरे, उषा नेवारे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page