Sunday, July 14, 2024
Google search engine
Homeअकोलाइंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशन येथे जागतिक योग दिवस साजरा..!
spot_img
spot_img

इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशन येथे जागतिक योग दिवस साजरा..!

Oplus_131072

 

मूर्तिजापूर :- “योगा हे सध्या च्या काळाची गरज असून आपले आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यासाठी सर्वांनी किमान दररोज अर्धातास योगा करणे गरजेचे असून याने आरोग्यास होणाऱ्या हानी मोठ्या प्रमाणात घट होईल असे प्रतिपादन इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशन च्या मुख्याध्यापिका सौ. प्रणाली भटकर माँ जागतिक योग दिनाच्या दिनी आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.

    मूर्तिजापूर येथील तिडके नगर स्थित इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशन मध्ये जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला.

जगाच्या पाठीवर २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्र संघाने सण २०१५ साला पासून जगभरात २१ जून हा दिवस योग दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. योग साधनेचे मूळ उगमस्थान हे भारत असून २१ जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. तर दक्षिण गोलार्धातील हा दिवस सर्वात लहान मानल्या जातो. त्यामुळेच जगभरातील अनेक भागांमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. याच दिवशी सर्वात पहिला योगी म्हणून गणला जाणाऱ्या शंकराने योग विषयीचे ज्ञान जगासमोर आणले म्हणून २१ जून हा जागतिक स्तरावर योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने मुर्तीजापुर येथील तिडके नगरस्थीत इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशन च्या प्रांगणात मुख्याध्यापिका, शिक्षकांनी व शाळेतील विद्यार्थ्यांनी सकाळी ८ वाजताच्या सुमारास एकत्रित सामूहिक रित्या योग शिक्षिका पराते मॅडम यांच्या मार्गदर्शनात योगा करून जागतिक योगा दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने योगा करून आपला सहभाग दर्शवीला.

  यावेळी इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशन च्या मुख्याध्यापिका सौ प्रणाली प्रवीण भटकर माँ,रेश्मा खरड, रुपाली हुरबडे, प्रतिक्षा कुऱ्हेकर, वैष्णवी बावणे, अनुराधा वानखडे, ठाकरे मॅडम,सुजता मोरे, दिशा कावरे, तृप्ती बुटे, वैशाली अढाऊ, मयुरी जावरकर, देशमुख मॅम, प्रियांका अंभोरे,हरणे मॅडम, बोळे मॅडम, सातपुते मॅडम, विल्सन सर, श्रीकृष्ण तायडे, विशाल गावंडे आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.

 

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page