Wednesday, October 9, 2024
Google search engine
HomeमनोरंजनVijay Kadam | दिग्गज अभिनेता विजय कदम यांचे निधन..! 67 व्या वर्षी...
spot_img
spot_img

Vijay Kadam | दिग्गज अभिनेता विजय कदम यांचे निधन..! 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..!

 

Vijay Kadam | दिग्गज अभिनेता विजय कदम यांचे निधन..! 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..!

 

मराठी रंगभूमी आणि सिनेमा गाजवणारे दिग्गज अभिनेता विजय कदम यांचे निधन झाले आहे. मराठी चित्रपटसृष्टीला हा मोठा धक्का असून गेल्या दीड वर्षापासून कॅन्सरने विजय कदम हे आजारी होते. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

हरहुन्नरी अभिनेता आणि आपल्या कॉमेडी टायमिंगने सर्वांना हसायला लावणारा असा कमालीचा अभिनेता विजय कदम यांचे आज सकाळी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले आहे. गेल्या दीड वर्षांपासून कॅन्सरमुळे विजय कदम हे काम करत नव्हते. तसंच ते कोणाच्याही आल्यागेल्यातही नव्हते. मराठी चित्रपटसृष्टीला सकाळीच आज हा धक्का मिळाला असून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. 

विजय कदम यांच्या पार्थिवावर आज अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र हरहुन्नरी आणि कमालीचा अभिनेता हरपल्याने नक्कीच मराठी चित्रपटसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली असल्याची हळहळ सर्वांकडून व्यक्त करण्यात येत आहे. विजय कदम हे 67 वर्षांचे असून त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि मुलगा असे त्यांचे कुटुंबीय आहे. गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते. अखेर त्यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला..

🎯विजय कदम यांची कामगिरी…

टूरटूर  “ मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासह खांद्याला खांदा लावून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे काम विजय कदम यांनी अचूक केले होते.विच्छा माझी पुरी करा हे त्यांचे लोकनाट्य तुफान गाजले. चित्रपट, मालिका आणि रंगभूमी त्यांनी गाजवली असून 1980 मध्ये त्यांनी लहानमोठ्या भूमिका करत आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली होती.तर अनेक मराठी चित्रपटांमधूनही त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांना जिंकून घेतले होते. यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत नक्कीच एक पोकळी निर्माण झाली आहे.

   अनेक विनोदी कलाकारांमध्ये विजय कदम यांनी आपली वेगळी छाप उमटवली होती आणि त्यामुळे त्यांच्या जाण्याने अनेक कलाकार शोक व्यक्त करत आहे. अचूक कॉमेडी टायमिंग आणि अभिनयाचा एक झराच जणू हरपला असल्याची भावना सर्वांच्या मनात निर्माण झाली आहे.

Gavakadachi Batmi

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page