प्रमुख वक्ते यशपाल भिंगे व सौरव हटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार सोहळा.
मूर्तिजापूर – धनगर समाज अधिकारी , कर्मचारी महिला व युवक संघटना अकोला जिल्ह्याच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुण्यतिथी कार्यक्रम तथा धनगर समाज गुणगौरव तसेच विविध क्षेत्रात व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांच्या व सेवानिवृत्त समाज बांधवांचा सत्कार सोहळा दिनांक २४ ऑगस्ट २०२४ शनिवारला सकाळी ११.०० वाजता प्रमिलाताई ओक हॉल अकोला येथे आयोजित केलेला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. आमदार हरिदास भदे असतील तर कार्यक्रमाचे उद्घघाटक सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक केशव पातोंड कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष डॉ. सुरेश बचे असतील कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून डॉ यशपाल भिंगे प्रमुख वक्ते, सौरभ हटकर मेंढपाळ आर्मीचे संस्थापक तर प्रमुख अतिथी म्हणून पंकज सुलताने, प्रमोद लहाळे ,प्रकाश पाचपोर, नितीन नवलकार, वसंत भदे ,विलास ईसळ ,प्रमुख उपस्थितीत दिनकर नागे, काशीराम साबळे ,दिनकर पातोंड ,सुमन गावंडे ,दीपक म.नागे, प्रा. एल डी सरोदे ,किसन घोंगे, नारायण ढवळे, पुष्पा गुलवाडे ,श्रीकृष्ण साबे, मोहन डांगे ,अरविंद गाडवे, रेखा डांगे, दिनकर नागे, राजेश नवलकार , महादेव साबे ,छाया कात्रे, राजेश गुरव तहसीलदार,योगेश ढेंगे ,विठ्ठल कवळकार, प्रकाश पाली आदी उपस्थित राहतील.