अमरावती – महानगर पालिका अंतर्गत एकूण 13 शहरी आरोग्य केंद्र असून 17 आरोग्य वर्धनी केंद्र आहेत त्या सर्व आरोग्य केंद्र मध्ये गप्पी मासे उत्पादन केंद्र असून जिथे जिथे डास उत्पती स्थान आहेत तिथे गप्पी मासे सोडण्याचा अभियान राबवण्याचा आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाच्या असून पंधरवडा राबवण्याचे निर्देश अमरावती शहराचे आयुक्त सचिन कलंत्री ,आरोग्य अधिकारी डॉ.विशाल काळे , डॉ.रुपेश खडसे साथ रोग नियंत्रण अधिकारी यांच्या मार्गदर्शन खाली शहरी आरोग्य केंद्र आयसोलेशन दसरा मैदान येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी खडसे यांच्या नेतृतवाखालील साई नगर, दसरा मैदान, व झोपडपट्टी परिसर, इतर अडगळीच्या डास उत्पती स्थाना मध्ये आईलबॉल तयार करून टाकण्यात आले.
स्वच्छ अमरावती. सुंदर अमरावती , गप्पी मासे पाळा.. डेंग्यू हिवताप चिकन गुणीया टाळा.. या बोधाचा वापर करून शहरी आरोग्य केंद्रचे वैद्यकीय अधिकारी डॉ अश्विनी खडसे, आरोग्य सेवक शरद सावळे आरोग्य सेविका सीमा डोंगरे , हेम लता मेश्राम अशा सेविका प्रतिभा भेलाये यांनी गप्पी मासे सोडून अभियानाची सुरवात केली ह्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.