Wednesday, October 9, 2024
Google search engine
Homeअकोलाएशियन तायक्वोंडो स्पर्धेत रोहीत ने घातली सुवर्ण पदकास गवसणी
spot_img
spot_img

एशियन तायक्वोंडो स्पर्धेत रोहीत ने घातली सुवर्ण पदकास गवसणी

मूर्तिजापूर – आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे संपन्न झालेल्या ओपन एशियन तायक्वोंडो चॅम्पियनशीप स्पर्धेत येथील ज्युबिली इंग्लीश शाळेचा इयत्ता आठवीत शिकणाऱ्या रोहीत दिपक खंडारे याने सुवर्ण पदकास गवसनी घालत शाळेचे नाव लौकिक केले.


चिनापट्टी राम कुटिया इनडोर स्टेडियममध्ये दिनांक २२, २३ व २४ ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या स्पर्धेत भारतासह आठ देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला. सिटी तायकोंडो क्लबच्या खेळाडूंनी आयटीएफयू एशियन टेकओनदो चॅम्पियनशीप-२०२४ या टेकओनदो असोसिएशन ऑफ इंडिया द्वारा आयोजित या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. स्पर्धेत रोहीत दिपक खंडारे याने कलर बेल्ट लढतीत प्रथम पारितोषिक प्राप्त करून सुवर्ण पदकावर नाव कोरले असून, ग्रुप टुल्समध्ये त्याला कांस्यपदक मिळाले.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई, वडील, मुख्याध्यापक, शिक्षक,मार्गदर्शक प्रशिक्षक दिनेश श्रीवास व सर्व शिक्षकांना दिले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page