मूर्तिजापूर – येथील सिटी तायक्वांडो क्लब ,कृष्णकामिनी बहुउद्देशीय संस्था ,तालुका क्रीडा संकुल मूर्तिजापूर व विविध क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मूर्तिजापूर येथे भव्य सायकल रॅलीचे आयोजन करून राष्ट्रीय क्रिडा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते क्रीडा संकुल मूर्तिजापूर पर्यंत क्रीडा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मूर्तिजापूर चे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक मुकुंद दानी , शिक्षक .ज्ञानेश ताले ,दिनेश श्रीवास ,विनोद काळपांडे ,मुकुंद पैकट ,प्रेमराज शर्मा ,रोहन शेळके , जितेंद्र चौबे उपस्थित होते.
मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे प्रथम पूजन करून सर्व गणमान्य व्यक्तींचे स्वागत करण्यात आले तसेच चिरंजीव पवार याला गुणवंत क्रीडा पुरस्कार देण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष दाने सरांनी चिमुकल्या खेळाडू मार्गदर्शन केले व पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे संचालन ज्ञानेश ताले व आभार प्रदर्शन क्रीडा संकुलचे विनोद काळपांडे यांनी केले.