नागरिकांच्या जीवाशी होतोय खेळ ; मुख्यमंत्र्याची लाडकी बहिणीच्या घरात गटाराचे पाणीच पाणी
प्रतिनिधी- मुर्तीजापुर शहराला लागत असणारे ग्रामसेवक कॉलनी , नालंदा नगर सिरसो या भागात संबंध वस्ती भरलेली असून मोठमोठ्या इमारतीचा निर्माण झपाट्याने चालू आहे परंतु येतील नागरिक मात्र सांडपाण्याच्या नाल्याचे गटाराचे, खराब पाणी मात्र रोडवर आल्यामुळे घराघरात आजारा ने थैमान घातले आहे. ज्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे डेंगू व मलेरिया सारखे आजारांचे आमंत्रण देण्याचं काम चालू आहे संबंधित ग्रामपंचायतला नागरिकांनी यासाठी बरेचदा निवेदने अर्ज विनंत केल्या परंतु आमचा उपयोग मात्र निवडणुकीच्या वेळेसच केला जातो असा येथील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. निवडणुकीच्या काळात भला मोठा आश्वासनाचा पाऊस पाडून तो पूर्ण केल्या जात नाही मग येतील जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो ही गट ग्रामपंचायत याकडे मात्र कोणी लक्ष द्यायला तयार नाही. यासाठी येथील स्थानिक नागरिकांनी बरेचदा जिल्हा परिषद सदस्यांना देखील याबाबत तक्रार केल्याचे सांगितले आहे परंतु येथील पुढारी लोकप्रतिनिधी मात्र नागरिकांच्या अत्यंत गंभीर समस्येचे प्रश्न न सोडवता आपल्याच मनमौजी , कार्यक्रमात व्यस्त असल्याचे दिसून येतात लोकप्रतिनिधींना ठिकठिकाणी दहीहंडी, क्रिकेटचे सामने, आश्वासनाचे शिबिर राबविण्यात व्यस्त आहे..
परंतु सामान्य नागरिकाच्या जीवनाशी खेळ होत असल्याचे येथील नागरिक संताप व्यक्त करत आहे येथेच राहत असणारे सौ. मेहेरे यांच्या घरात या गटाराचे पाणी शिरले असून गेल्या पाच तासापासून पाण्याचा उपसा करत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी लोकप्रतिनिधींना विचारण्याची वेळ आलेली आहे आमच्या मतांचा उपयोग फक्त आपल्या स्वतःच्या गरचा पूर्ण करण्यासाठी होतोय का समाजामध्ये मानसन्मान, लोकप्रतिनिधींचा थाट, ब्रँडेड गाड्या, एक गाडी घेतली ती दुसरी गाडी, भरमसाठ पैसा याच्या जोरावर जनसामान्यांना विकत घेतले जाते असे मत येथील नागरिकांनी मांडले आहे. या कुठेतरी अंकुश लावणे गरजेचे झाले आहे त्यामुळे येथील नागरिकांनी यापुढे मतदानच करायचं नाही असे एकमत बनवले आहे.
यापुढे विकास नाही तर मतदान ही नाही. घराघरात पाणी सोडल्यामुळे रस्ते देखील तुडुंब भरून वाहत असल्याने येथील समस्या कशा सोडवाव्यात प्रश्न नागरिकांसमोर पडला आहे. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींना अजूनही जागे होऊन आमच्या समस्याचे निराकरण करण्यात यावे व तात्काळ येथील सांडपाण्याची गटाराचे व्यवस्था करण्यात यावी अशी विनवणी संबंधित लोकप्रतिनिधींना करीत आहेत.