राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना वित्तीय अनुदान बंद केल्याचे दि.3 सप्टेंबर 2024 चे शासनाचे परिपत्रक रद्द करण्याबाबत केली एकमुखी मागणी.
सदर परिपत्रकाचा विपर्यास झाल्याचे सांगून सदर परिपत्रक रद्द करण्यात येत असल्याची घोषणा माननीय उपमुख्यमंत्री यांनी केली.
दि.6/9/24 रोजी नागपूर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. बबनराव तायवाडे, राष्ट्रीय सरचिटणीस सचिन राजूरकर,राष्ट्रीय सचिव शरद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना वित्तीय अनुदान बंद केल्याचे शासनाचे परिपत्रक रद्द करण्याची व शेतकरी आत्महत्येचा विषय संवेदनशील असून त्यासंदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा अशी मागणी केली.
याबाबत त्वरित माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन रद्द करण्यात येत असल्याचे सांगितले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी प्रवीण तायडे, प्रवीण वानखडे, निलेश उभाड, राजू चौधरी आदी मंडळी उपस्थित होती.