बाजार समिती ई- निविदा भ्रष्टाचार प्रकरणी… विभागीय आयुक्तांनी.. सहनिबंधकांना दिले चौकशीचे आदेश
कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव/संचालकांना धोक्याचा घंटा
सहकार क्षेत्रात लागले ग्रहण
अमरावती – दिनांक 22 सप्टेंबर 2024.बाजार समितीला प्राप्त होणारे वैभव हे बळीराजाच्या कष्टाचे आणि काळ्या मातीत जिरलेल्या त्यांच्या घामाचे सुगंधित प्रतीक असणारी पश्चिम विदर्भातील उच्चतम आणि नामांकित असणारी एकमेव अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती एक हाती सत्ता असणाऱ्या समितीने गेल्या वर्षभरात केलेल्या गैरप्रकार व भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले असून अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने 44 लक्ष रुपयांचे विधुत कामांमध्ये प्राप्त निधीचे ई- निविदा प्रक्रिया न राबवता,एका कामाचे अनेक बनावट प्राकलन तयार करून सभेची मंजुरी न घेता नियमबाह्य कामे केली असल्याने शेतकरी संघर्ष समितिचे अध्यक्ष प्रकाश साबळे, सचिव शेखर कृ.औगड,उमेश महिंगे,योगेश देशमुख,राहुल तायडे आदी समिती पदाधिकाऱ्यांनी मा. विभागीय आयुक्त यांनी दाखल तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांना लेखी चौकशीचे आदेश दिले असल्याने या प्रक्रियेत समाविष्ट असणारे अधिकारी व संचालक मंडळ अडचणीत असल्याने त्यांच्या पदाला ग्रहण लागले असून प्रकरणी काय कार्यवाही होते याकडे शेतकरी वर्ग, ग्रामस्थ व सहकार क्षेत्र लक्ष देऊन आहे.
सविस्तर वृत्त असे वन मॅन शो असलेल्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती विकास कामांकारिता दिनांक 23 फेब्रुवारी 2024 नुसार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांची प्रशासकीय मान्यता आदेशा 44 लाख रुपये विधुत कामांकारिता मान्यता प्राप्त झाली.
कोणत्याही शासकीय खरेदी प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी दहा लाख रुपये पेक्ष्या अधिक खर्चाचे कामांना शासनाने ई- निविदा पद्धतीचा अवलंब केला असून अमरावती बाजार समितीने कोणतीही ई निविदा प्रक्रिया न राबवता नजीकच्या कंत्राटदारास बनावट प्राकलन तयार करून कामाचे तुकडे करून सदर कामे दिली असल्याची तक्रार शेतकरी संघर्ष समिती द्वारे विभागीय आयुक्त अमरावती यांना देण्यात आली. संचालक सभेत निविदा विषयांवर चर्चा न होता काही संचालक अंधारात असून काही तुपाशी… तर काही उपाशी…
.असल्याने उपाशी यांचे पोटात कावळे ओरडत असल्याने त्रस्त आहेत. एक हाती सत्ता असणाऱ्या बाजार समितीत शेतकऱ्यांचे पैशावर मोठी लूट केल्या जात असून शेतकऱ्यांना पाहिजे त्या सुविधा मिळत नाहीत शेतकऱ्याचे धान्य/मात्रा चोरी प्रकार अधिक प्रमाणात असून त्यावर प्रशासन अंकुश ठेवत नसल्याने शेतकऱ्याचे तक्रारीचे प्रमाण अधिक असल्याने तक्रारीवर समितीकडून निराकरण केल्या जात नाही त्याचप्रमाणे प्रशासकीय कामकाजात नियमबाह्य केलेल्या कामकाजांच्या अनेक तक्रारी पडून असल्याचे आयुक्त,जिल्हाधिकारी यांना माहिती दिली असता त्यावर विभागीय आयुक्त, अमरावती विभाग अमरावती यांचे निर्देशीत सामान्य प्रशासन विभाग शेतकरी हितार्थ सकारात्मक भूमिका घेऊन तात्काळ चौकशी करण्याचे विभागीय सहनिबंधक अमरावती यांना लेखी आदेश देऊन केलेला कार्यवाहीचा अहवाल मागणी केलेला आहे. त्यावर शेतकरी संघर्ष समितीने बाजार समितीच्या होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा लावत असून त्यावर प्रशासनातील पारदर्शक सनदी अधिकारी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी शेतकरी हितार्थ तात्काळ निर्णय घेत असल्याने सामान्य जनतेमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
प्रतिक्रिया….
वेळीच रस्त्यावर उतरून आंदोलन करू
बळीराजाचं केंद्रबिंदू
प्रति वर्ष पंधराशे कोटी रुपयांची उलाढाल असणारी विदर्भातील एकमवे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती तक्रारीने ग्रासली असून शेतकऱ्याचे निधीचा दुरुपयोग करून एकहाती सत्ता आल्याने आर्थिक डल्ला मारल्या जात आहे.शेतकरी संघर्ष समिती पदाधिकारी बाजार समिती प्रशासनाविरुद्ध दंड थोपटून आहे.बाजार समितीतील कंत्राट,निविदा,भंगार रद्दी,मातेराविक्री,बांधकाम,वसुल केले जाणारे सेस,गैर मार्गाने वाटप केलेली दुकानें/परवाने आदी अनेक तक्रारी शासन दरबारीं असून त्यांचेवर नियमाने कार्यवाही केल्या जाणार असून बाजार समितीचा मोठ्ठा भ्रष्टाचार उघड होईल याची खात्री शेतकरी संघर्ष समिती देत आहे.
शेखर कृ.औगड
सचिव, जिल्हा शेतकरी संघर्ष समिती. अमरावती.