” चुल आणि मुल ” या म्हणीवर डॉ. सुगत वाघमारेंच्या तिक्ष्णगत संस्थेनी केली मात
विदर्भ संपादक मिलींद जामनिक
मूर्तिजापूर – टीव्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर परिचत व प्रसिद्ध असलेले लाडके ‘भाऊजी आदेश बांदेकर यांचा खास महिलांसाठी ‘खेळ मांडियेला’ हा कार्यक्रम २१ सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुगत वाघमारे यांनीकेले होते.
खेळ, किस्से आणि गप्पा गाणी संगीतमय ही धमाल असं म्हणत महिलांसाठी पैठणीसह अनेक बक्षिसांची लयलूट करणारा ‘खेळ मांडियेला हा कार्यक्रम येथील लाल शाळा मैदानावर पार पडला. महिलांशी हसत खेळत किस्से आणि गप्पांबरोबर विविध खेळ खेळत आनंदमय वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमाला महिलांचीनभुतो नभविष्याती अशी रेकॉर्ड ब्रेक गर्दी उसळली होती. महिलांनावितरित केलेल्या कुपनच्या माध्यमातून लकी ड्रॉ काढण्यातआला. यातून तीनशेच्यावर महिलांना खेळ खेळण्यासाठी संधी मिळाली. धम्माल मस्ती बरोबरचसामूहिक फुगडी, नाच याचा मनमुराद आनंद उपस्थित महिलांनी लुटला.
हजारों महिलांना बक्षिसांची लयलूट
या खेळांच्या माध्यमातून शेकडो महिलांनी भेटवस्तू पटकावल्या तर शेवटी तीन विजेत्या महिलांना भरजरी पैठण्या बक्षीस म्हणून देण्यात आल्या, सोबतच या कार्यक्रमाला उपस्थित हजारो महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. या प्रसंगी तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुगत वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले. गेली २० वर्षे आपण महाराष्ट्रभर कार्यक्रमाचे सादरीकरण करत आलो त्यातील काही आठवणी व किस्सेही आदेश बांदेकर यांनी सांगितले