बळीराज्यांच्या स्वप्नांची झाली राख रांगोळी ; २६ एकर सोयाबीनवर फिरवला रोटावेटर…!
विदर्भ संपादक मिलींद जामनिक
मूर्तिजापूर – शेतकरी मोठे स्वप्न घेऊन आपले पिकाची पेरणी करीत असतो. त्या उत्पन्नावर चालणारा त्याचा संसार ,पीक न झाल्यामुळे त्याच्या संसाराचा आर्थिक गाडा मोडकळीस येतो .मूर्तिजापूर तालुक्यातील जीतापुर खेडकर, ब्रम्ही या गावातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला शेंगाच लागल्या नसल्यामुळे एका महिन्यात हाती येणाऱ्या पिकावर रोटावेटर चालविण्याची नौबत येथील शेतकऱ्यांवर आली आली आहे.
मोठ्या मेहनतीने शेती तयार करून महागडे बियाणे,खते,फवारण्या करून पीक उभे केले परंतु अतीवृष्टीने वाढविलेल्या पिकाला शेंगाच लांगल्या नाहीत.त्यामुळे सोयाबीन वखरण्याचां निर्णय घ्यावा लागल्या मुळे एकरी १५००० रुपयांचा खर्च वाया गेल्या मुळे
शासनाने एकरी वीस हजाराची मदत देवून ,पीकविमा देण्यास विमा कंपनीस बाध्य करावे अशी मागणी संकटग्रस्त शेतकरी धम्मा नंद तायडे,रामभाऊ तायडे,राजू डोंगरे,धम्मापल डोंगरे,रणजित डोंगरे,गजानन घोडेस्वार, जनमंच,प्रगती शेतकरी मंडळाचे प्रमोद खेडकर यांनी केली आहे.