शेतकरी हितार्थ विविध मागण्यांचे वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन
विदर्भ संपादक मिलींद जामनिक
मूर्तिजापूर – तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २० हजार रुपये मदत द्यावी,सततच्या पावसामुळे सोयाबीनला शेंगा न लागल्या अशा शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत द्यावी तसेच उर्वरित शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी अशा विविध शेतकरी हितार्थ मागण्यांचे निवेदन (ता.२४) रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व महासचिव मिलिंद इंगळे यांच्या मार्गदर्शनात तालुकाध्यक्ष सुनील सरदार यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले.
यावेळी तालुका अध्यक्ष सुनिल सरदार, शहर अध्यक्ष तसवर खान, महिला आघाडी तालुका अध्यक्षा लक्ष्मीताई वानखडे, महिला व बालकल्याण सभापती रिजवाना परवीन शेख मुख्तार, युवक आघाडी तालुकाध्यक्ष अक्षय राऊत, जेष्ठ नेते भैय्यासाहेब तायडे,आकारामजी बोराखडे, प्रधान गुरुजी, सुनील जाधव, बाळासाहेब ठोकळ,शेख मुख्तार शेख साहेब, सुनिल सरोदे,बंडू वानखडे, मोहन रोकडे,नाना गावंडे, देवानंद सरदार, सतीश गवई,करण वानखडे, सतीश खंडारे, महेंद्र तायडे, रितेश गोपकर, राजेंद्र मोहोळ, मोहन रोकडे, सरपंच किशोर नाईक, महिला आघाडीच्या शिल्पाताई वानखडे, नम्रता किर्दक, प्रिती पंडित, बेबीताई चव्हाण,प्रभा वानखडे यांच्या सह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.