बाळासाहेब शिंदे अतनूर / प्रतिनिधी
नदीना-नाले दुथडीभरून, अतनूर परिसरात ढगफुटीसदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत
लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातील अतनूर परिसरातील २८ गावा सह अनेक भागात बुधवारी मुसळधार पाऊस झालाय. शेतशवारात पाणीच पाणी जमा झालंय. जनजीवन विस्कळीत झालं आहे.
अनेक भागात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतनूर लगत तिरू नदी, नाले, ओढे, दुथडी भरून वाहत आहेत. उदगीर – अतनूर – बा-हाळी जाणारा अतनूर तिरु नदीवरील पर्यायी पुल पून्हा पाण्याखाली गेला असून काही रस्ता वाहून गेला आहे. रस्ता वाहून गेल्यामुळे या भागातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. अतनूर परिसरातील २८ गाव, वाडी, तांडा, वस्तीत आज पहाटे व सायंकाळी मुसळधार पाऊस झाला आहे. या परिसरातील शेती पिकांमध्ये पाणी जमा झाले आहे. काढणीला आलेलं किंवा काढून ठेवलेले सोयाबीन या पावसाने मातीमोल झाले आहे.
जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. अनेक भागात पावसानं जो्रदार हजेरी लावली आहे. जळकोट तालुक्यातल्या अतनूर तिरु नदीवरून वरून उदगीर, बाऱ्हाळी, जळकोट, मुखेड, देगलूर कडे जाणारा रस्ता तिरू नदीला व ओढ्याला पूर आल्यामुळे पर्यायी पुल रस्ता पाण्याखाली गेला तर आजूबाजूची कच्ची बाजू वाहून गेला आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक, आंध्र प्रदेशच्या २२ गावांना जोडणारा पूल दोन महिन्यांपुर्वी पावसात गेला होता वाहून, वाहतूक ठप्प, जनजीवन विस्कळीत झाली होती.
लातूरमधील अतनूर हे गाव महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या सीमारेषेंना लागून आहे. या गावासह २८ गावांना जोडणारा पूल मागील महिण्यात गेल्या अनेक दिवस झालेल्या पावसामुळे वाहून गेलाय.
मागील चार ते पाच दिवसापासून सततच्या पावसामुळे तिरू नदीला खूप पाणी आलं आणि येथील रस्ता आणि पर्यायी पूर वाहून गेला आहे.
महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यासह २८ गावांचा संपर्क असणारा पूल वाहून गेल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.
अतनूर ,गव्हाण, मेवापूर ,चिंचोली, गुत्ती , जळकोट, घोणसी-अतनूर, बाराहाळी, देगलूर, मुखेड, नळगीर अशा २८ गावांना याचा फटका बसला आहे. बसत आहे.
लातूरमधील अतनूर हे गाव महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या सीमारेषेंना लागून आहे.
या रस्त्यावरील पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी पूल आणि रस्ता निर्माण करण्यात आला होता.
उदगीर, जळकोट तालुक्यातील अतनुर येथील पर्यायी पूल वाहून गेल्यामुळे मुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
शिवसेना ( उबाठा ) यांचे निवेदन.
उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम उप विभाग जळकोट यांना आज बुधवार दि.२५ रोजी निवेदनाद्वारे विषयांकीत अतनूर येथील तेरु नदीवर बांधलेल्या पर्यायी पूलाची उंची वाढणे बाबत. ९ सप्टेंबर रोजी अतनूर येथील पर्यायी रस्त्याची दुरुस्ती करावी व पर्यायी पुलाची उंची वाढवावी यासाठी शिवसेनेच्या वतीने निवेदन दिले होते आणि तो पूल १७ सप्टेंबर पर्यंत दुरुस्त करण्यासाठी वेळ दिला होता. अन्यथा शिवसेनेच्या वतीने जलसमाधी आंदोलन करणार आहोत असे निवेदनात आपल्याला सांगितले होते.
तरी आपण १७ सप्टेंबर पर्यंत आमची मागणी पूर्ण न केल्याने १७ सप्टेंबर २०२४ रोजी काही शिवसैनिकांना घेऊन मी जलसमाधी आंदोलन करण्यासाठी मी तेरु नदी पत्रात पाण्यात उतरलो. जवळपास २ तास आंदोलन झाले त्यावेळेस आपण हा रस्ता व पूल दुरुस्ती करण्यासाठी तुम्ही ८ दिवसाचा वेळ लेखी लिहून दिला होता. तरीही दिलेल्या वेळेत आपण आमची मागणी पूर्ण केली नाही.
वेळोवेळी विनंती करून ही आपण आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलात.
जोपर्यंत अतनूर येथील पर्यायी पुलाची उंची वाढवून जनतेची गैरसोय थांबवणार नाही तोपर्यंत आम्ही संबंधित पुलाचे काम होऊ देणार नाही याची गांभिर्याने दखल घ्यावी.
मुक्तेश्वर गोविंदराव येवरे पाटील अतनूरकर ( शिवसेना तालुका प्रमुख जळकोट )