प्रगती शेतकरी मंडळाचा निवेदनातून इशारा
विदर्भ संपादक मिलींद जामनिक
मूर्तिजापूर – नाफेड द्वारे सोयाबीन ३० सप्टेंबर पूर्वी खरेदी व्हावी, शासनाने जाहीर केलेला रब्बी पिक विमा शेतकऱ्यांना त्वरीत मिळावा, अतिवृष्टीमुळे २५ टक्के अग्रीम पीक विमा जाहीर करावा, पीक कर्जा”ला कॅश क्रेडिट नियम लागू करावेत, शेत कुंपणाला पंधरा वर्षे दीर्घ मुदती कर्ज धोरण आखावे, वृद्ध शेतकरी शेतमजूर यांना दहा हजार रुपयाची पेन्शन मिळावी आदी मागण्यांसाठी तहसील कार्यालय परिसर मूर्तिजापूर येथे दिनांक ४ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर २०२४ या कालखंडात साखळी ते अन्नत्याग उपोषण प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ वानखडे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.त्यामध्ये ट्रॅक्टर ,बैल बंड्या, सह तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होऊन शासनाचे लक्ष वेधले. प्रवीण लोखंडे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांनी आंदोलन स्थळाला भेट देऊन ३० सप्टेंबर पर्यंत नाफेड खरेदी केंद्र चालू करण्यात येतील असे आश्वासन दिले . तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या विनंतीवरून उपोषण २ ऑक्टोबर पर्यंत तूर्त स्थगित करण्यात आले होते. नाफेड खरेदी केंद्र चालू करण्याचे कुठलेही हालचाल दिसत नसल्यामुळे , २५% अग्रीम विमा देण्यासंबंधी जिल्हाधिकारी अकोला यांच्याशी शेतकरी मंडळाने चर्चा करून निवेदन दिले.नाफेड सोयाबीन खरेदी बाबत डी डी आर,अकोला व रब्बी पिक विमा देण्यासंबंधी शंकर किरवे, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी यांनासुद्धा २३ सप्टेंबर रोजी निवेदन दिले.प्रशासनाने आश्वासनपूर्ती ३० पर्यंत केली नाही तर मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकरी स्थगित केलेले आंदोलन ३ ऑक्टोबर २०२४ पासून पुन्हा सुरू करतील असे निवेदन संदीपकुमार अपार उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी मूर्तिजापूर यांना प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ वानखडे, जनमंच नागपूर तालुकाध्यक्ष प्राध्यापक सुधाकर ,गौरखेडे, आंतरभारती पुणे तालुका सचिव प्रमोद राजंदेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कैलास साबळे, न्यू यंग क्लबचे मुन्ना नाईकनवरे, यंग बॉईज क्लब चे पंकज कांबे, शेतकरी युवा आघाडी चे पंकज वानखडे, सेवा सहकारी सोसायटी मुर्तीजापुर चे अध्यक्ष श्रीकृष्ण गुल्हाने, बाजार समितीचे मा.संचालक संजय वानखडे, मनोहर ताकतोडे, डॉ. गोपाल बोळे, नंदकिशोर बबानिया, अभी पोळकट, प्रफुल्ल मालधूरे, विकी तिवारी, अनिल देवगिरीकर, हरिदास फुके, गिरीश चतुरकर, राजू काळे, मनीष मुंदडा, सचिन काकड,पंकज गावंडे, बबनराव खोत, संतोष रुद्रकार, निळकंठराव गिऱ्हे, जगदीश जोगळे, सुभाष खटिंग, सतीश वाघ, पुरुषोत्तम धवक, विनोद तांबडे, अक्षय म्हसाये, दिलीप घाटे, संतोष काटे, भास्कर मोहोड,अरुण बोंडे यांनी दिले.