मूर्तिजापूर – येथील डॉ. सुगत वाघमारे मित्र परिवाराच्या वतीने ‘काव्य कलश’ कविसंमेलनाचे आयोजन शनिवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता येथील शिवाजी नगरातील लाल शाळेच्या प्रांगणात करण्यात आले असून, युग कवी डॉ. कुमार विश्वास यांचा सहभाग हे या कविसंमेलनाचे वैशिष्ट्य असेल. डॉ. कुमार विश्वास यांच्यासह रमेश मुस्कान, राम बाबू, चंदन राय व भुवन मोहिनी या कवींचाही या कविसंमेलनात सहभाग असेल. शब्दांची गुंफण अन् सुरेल काव्य संमेलन, भावनेच्या तरंगात न्हावून निघेल सर्वांचे मन, ही टॅग लाईन घेऊन तिक्ष्णगत वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून सादर होणाऱ्या या कविसंमेलनाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.