गावाकडची बातमी, श्रीकांत राऊत यवतमाळ
महागाव :-काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणावर आणि नेतृत्वावर आणि विचारावर विश्वास ठेवत उमरखेड तालुक्यातील निंगनूर, इसापूर,अमडापूर, पिरंजी, सोईट, तर महागाव तालुक्यातील दगडथर, पिपंरी, पिपंळगाव, अशा अनेक गावातील शेकडो तरुणांनी 27/9/2024 शुक्रवार रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तर हा पक्ष प्रवेश सोहळा उमरखेड येथे काँग्रेस भवन जवळी आवारात पार पडला.
तर सध्या उमरखेड विधानसभा मतदारसंघातील तरुण वर्ग हा काँग्रेस पक्षाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होताना दिसत आहे आणि दिवसेंदिवस शेकडो तरुण काँग्रेस पक्षात प्रवेश घेत आहेत. जवळपास 700 ते 800 तरुणांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
मागील एका दशका पासून उमरखेड विधानसभा मतदारसंघ हा भाजपच्या ताब्यात आहे. पहिले हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण हा बालेकिल्ला मागील एका दशकापासून भाजपाने काबीज केला असून उमरखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये मागील दहा वर्षापासून भाजपा सत्तेत आहे.
पण मागील दहा वर्षापासून भाजपाचे तात्कालीन आमदार आणि विद्यमान आमदार हे उमरखेड विधानसभा मतदारसंघातील समस्या सोडविण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. उमरखेड मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा टक्का दिसून येतो तरुणांच्या हाताला काम नाही.
महागाव आणि उमरखेड तालुक्यात एमआयडीसी नुसती नावापुरतीच आहे यामध्ये कोणतेही मोठे उद्योग नाहीत. मागील दहा वर्षात भाजपाचे तात्कालीन आमदार आणि विद्यमान आमदार यांनी उमरखेड आणि महागाव तालुक्यात मोठे उद्योग आणण्याकरिता कोणतेही पाऊल उचलले नाही. 2014 ते 2019 मध्ये उमरखेड विधानसभा मतदारसंघांत तरुण वर्गाने पसंती देत भाजपाला सत्ता काबीज करून दिली होती.
आणि आता भाजपा वरील प्रेम कमी करून तरुण वर्गाने पुन्हा काँग्रेसची वाट धरली. तर आता विधानसभेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असून उमरखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये तरुण वर्गाची काँग्रेस पक्षात होणाऱ्या इन्कमिंग मुळे भाजपाची धागधुक चांगलीच वाढली आहे.
तर उमरखेड विधानसभा मतदारसंघा मध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला फायदा आणि भाजपाला नुकसान होईल असेही बोलल्या जात आहे.
तर मागील अनेक दिवसापासून मरगळ आलेल्या काँग्रेसला वर्षभरापूर्वी आलेले साहेबराव कांबळे यांनी नवसंजीवनी दिल्याचे बोलले जात आहे. उमरखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये साहेबराव एन्ट्री होताच काँग्रेस सावरल्या गेली. साहेबराव कांबळे यांनी तातू भाऊ देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रामभाऊ देवसरकर दतरावजी शिंदे आणि उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे किंगमेकर गोपाल भाऊ अग्रवाल यांच्या नेतृत्वात साहेबराव कांबळे यांनी जी पक्षासाठी मेहनत घेतली.
तर वर्षभरापूर्वी एन्ट्री करणाऱ्या साहेबराव कांबळे यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ आहे. आणि त्याचाच परिणाम आज काँग्रेस पक्षात दिसत असल्याचेही मतदारातून बोलले जात आहे.
तर या पक्ष सोहळ्याला
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस तातूजी देशमुख,गोपाल भाऊ अग्रवाल,दत्तराव शिंदे, प्रेमराव वानखेडे, दादाराव गव्हाळे किशोर भवरे, राजू मुडे,बिरजू मुडे, राहुल वानखेडे, हमीद भाई कुरेशी तसेच उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे सह कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.