अतनूर : जळकोट तालुक्यातील तलाठी सज्जा अतनूर येथे मतदान यंत्राविषयी जनजागृती दि.२३ बुधवार, गुरुवार, शुक्रवार रोजी तलाठी सज्जा अतनूर ता. जळकोट येथील अतनूर, मरसांगवी, गव्हाण, चिंचोली व शिवाजीनगर तांडा येथे मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने मतदान यंत्र EVM व VVPAT यांचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच अतनूर येथील विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अतनूर येथे नवमतदारांना EVM व VVPAT यंत्राबद्दल माहिती देऊन मतदान जनजागृती करण्यात आली. यावेळेस उपस्थित BLO बिचकुंदे, सूर्यवंशी, साहेबराव गव्हाणे, बालाजी गव्हाणे, नारायण राठोड, उदगीरकर, देवकते, बालाजी केंद्रे, तलाठी अतिक शेख, शिल्प निदेशक भिंगोले, काळे, ग्राहक संरक्षण परिषदेचे शासननियुक्त अशासकीय सदस्य बी.जी.शिदे अतनूरकर व मोठ्या प्रमाणात मतदार उपस्थित होते. येथे मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक मतदारांना दाखविण्यात आले.
उदगीर-जळकोट मतदार संघातील प्रत्येक गाव, तांडा, वाडी या ठिकाणी जिल्हाधिकारी सौ. वर्षा घुगे- ठाकूर, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जळकोटचे तहसिलदार राजेश लांडगे, उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर हे गाव , तांडा, वाडी निहाय मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवण्यात यावं यासाठी नियोजन करून तसे आदेश काढून प्रत्येक गावात मतदाराला मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येऊन नव मतदाराचे जास्तीत जास्त सहभाग व्हावा मतदाराची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न करत आहेत.जळकोट तालुक्यातील अतनूर, गव्हाण, चिचोली, मरसांगवी, शिवाजी नगर येथे मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी मंडळ अधिकारी, अतनूर सज्जा चे तलाठी अतिक शेख, बीएलओ, मतदान प्रात्यक्षिक दाखवणारे कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.